खाजगी रुग्णालयाच्या तपासणीमुळे डॉक्टर धास्तावले.
गंभीर त्रुटी असलेल्या दोन डॉक्टरांनी वैद्यकीय पथकांची नोटीस.
65 पैकी उर्वरित डॉक्टरांच्या रुग्णालयाची तपासणी गुरुवारी.
सेलू प्रतिनिधी
समशेर खान.
वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या शहरातील 65 डॉक्टरांच्या नर्सिंगहोम व क्लिनिकची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून गतवर्षी त्रुटी आढळून आलेल्या ५ डॉक्टर व नव्याने उघडलेल्या ७ अशा १३ डॉक्टरांच्या रुग्णालयाची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सेलू उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हारबडे यांनी दिली आहे. या पथकाने स्टेशन रोडवरील डॉ. आलेश बुरेवार यांच्या धन्वंतरी क्लिनिक व पारीक कॉलनीमधील डॉ. उद्धव खुरूसने यांच्या साई क्लिनिकची तपासणी केली असता या दोन्ही रुग्णालयात गंभीर व समाजाला घातक अशा प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. या दोन्हीही डॉक्टरांना त्रुटीच्या संदर्भात खुलासा मागविण्यात आला असून जर खुलासा समाधानकारक न आल्यास उभयतांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान या दोन डॉक्टरांपैकी डॉ आलेश बुरेवार हे तर उपजिल्हा रुग्णालयात नॅशनल स्कूल हेल्थ प्रोग्राम अंतर्गत कार्यरत आहेत. त्यांच्या खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर या पथकांला त्रुट्या आढळून आल्या आहेत. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने या तपासण्या होत असून या पथकात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, डॉ. जनार्दन गोळेगावकर, अर्जुन सोळंके, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती चव्हाण हे काम पाहत आहेत. शहरातील २ रुग्णालयाच्या डॉक्टरांना या पथकाने तपासणीनंतर त्रुटी आढळून आल्यावर त्यांना खुलासा करण्याची लेखी स्वरुपात पत्र दिले आहे. या प्रकाराने शहरात वैद्यकीय व्यवसाय करणार्यात मोठी खळबळ उडाली असून त्रुटीची सावरासावर करण्यासाठी काही रुग्णालयात बुधवारी डॉक्टरांची मोठी धडपड सुरू होती. पथकाच्या नियमाच्या कचाट्यात अडकू नये यासाठी काही डॉक्टर ज्येष्ठांचा सल्लाही घेत होते. एकंदरीत गुरुवारी या पथकास आपल्याकडे एकही त्रुटी आढळून येऊ नये यासाठी डॉक्टरांचा प्रयत्न चाललेला आढळून आला. म्हणूनच डॉक्टर आपली तपासणी बिनबोभाट पार पडण्यासाठी धास्तावलेले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें