मानवतरोड येथील रेल्वेगेटवर भरधाव आयशर ने उभ्या मोटरसायकलीना उडविले!
धडकेत १४ वर्षिय मुलगा ठार; तीन जख्मी.
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०२: मानवत तालुक्यातील मानवत रेल्वेस्टेशन येथील गेटवर फाटक लागलेले असताना व यावेळी सर्व वाहाने गेट उघळण्याच्या वाटेत असताना परभणी कडुन येणाऱ्या आयशरने उभे आसलेल्या दोन मोटरसायकलीना जोरदार धडक दिली यात ४ जन फेकल्या गेले यात मानवतरोड येथील रहीवासी विशाल पवार वय १४ वर्ष हा वाहनासोबत फरफटत गेल्याने जागेवरच ठार झाला.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, आज दि.२ मे रोजी सध्याकाळी ५-३० वाजता मानवतरोड येथे रेल्वेगेट लागल्यामुळे येथे मोटरसायकली व वाहने थाबलेले असता गेट उघळताच परभणीकडुन मानवतकडे जाणाऱ्या भरधाव वेगाने माघुन येणाऱ्या आयशर क्रमांक एम.एच.१३ आर १२४७ या वाहनाने दोन मोटरसायकलीना उडविले यात विशाल पवार वय १४ वर्ष जागेवरच ठार झाला तर यात साईनाथ पवार रा.मानवतरोड वय ४५ वर्ष,हनुमंत मुळे रा.माजलगाव वय ४५ वर्ष,मीरा हनुमंत मुळे वय ३५ वर्ष हे सर्व गंभीर जख्मी झाले आहे यातील सर्व जख्मीना परभणी येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे .घटना घडताच जागृत नागरिकांनी १०८ वर अमबलस ला फोन करुन बोलावुन घेतले व उपचारासाठी मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते.घटनास्थळी उपस्थीत नागरिकांनी आयशरच्या ड्रायव्हारास बेदम मारहाण केली यानंतर बेशुद्ध अवस्थेत पोलीसांनी ड्रायव्हारास उपचारासाठी रुग्णालयात आणले होते यानंतर आयशरच्या ड्रायव्हारास ही परभणी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.मृत बालकास बघुन नातेवाईकांनी रुग्णालयात हंबरडा फोडल्याने उपस्थीत नागरीकही हेलावुन गेले होते या घटनेने मानवतरोड परिसरातील नागरीक हळहळ व्यक्त करीत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें