Teaching a girl is to teach the community.=एका मुलीला शिकविणे म्हणजे समाजाला शिकविणे..हजरत गुलाम मोहम्मद वस्तान्वी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 21 अप्रैल 2018

Teaching a girl is to teach the community.=एका मुलीला शिकविणे म्हणजे समाजाला शिकविणे..हजरत गुलाम मोहम्मद वस्तान्वी.

एका मुलीला शिकविणे म्हणजे समाजाला शिकविणे..हजरत गुलाम मोहम्मद वस्तान्वी.


शेख मुनाफ पटेल
पैठण तालुका प्रतिनिधी
आडुळ येथील मदरसा अल बनात आयेशा सिद्दीका (रजी) येथे जलसा उत्साहात संपन्न
आडुळ ता.21 (बातमीदार) एका मुलीला शिक्षण देवुन तिला शिक्षित करणे म्हणजे
समाजाला शिक्षित करणे आहे कारण मुलगी शिकली म्हणजे ती कुटुंबाला
शिकविते आणि कुटुंब शिकला म्हणजे समाज शिक्षित होतो ते हजरत मौलाना
गुलाम मोहम्मद वस्तानवी (अध्यक्ष,जामीया इस्लामीया इशातुल उलुम
अक्कलकुआ) यांनी आडुळ ता. पैठण येथील मदरसा अल बनात हजरत आयेशा
सिद्दीका (रजी) च्या स्नेह संम्मेलन (जलसा) च्या कार्यक्रमात प्रसंगी बोलत होत.
यावेळी केले विलास भुमरे (सभापती अर्थ व बांधकाम जि.प.), माजी आमदार
संजय वाघचौरे, हाजी जब्बारसेठ बागवान, पैठण), ज्योतीताई पठाडे (जिल्हाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस युवती), तुषार पाटील शिशोदे (भाजपा तालुका अध्यक्ष), नम्रता
पटेल (भाजपा पैठण शहराध्यक्ष महिला आघाडी), गोरक्ष खरड (सहायक पोलिस
उप निरिक्षक पाचोड पोलिस ठाणे), आप्पासाहेब निर्मल (जायकवाडी पाणी संघर्ष
समिती संस्थापक अध्यक्ष), बद्रीनारायण भुमरे (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष),
रुस्तुमराव वाघ (माजी व्हाईस चेअरमन संत एकनाथ सहकारी साखर कारखाना),
हाजी मुक्तार मौलाना (माजी सरपंच ), शुभम पिवळ (पंचायत समिती सदस्य
आडुळ), सौ. शेख शमीम नासेर (सरपंच आडुळ), अलका राहुल बनकर (उपसरपंच
आडुळ), सिंधुताई पिवळ ( तनिष्का गट प्रमुख आडुळ), माजी सरपंच कासाबाई
कोल्हे, गोविंदतात्या शिंदे, कृष्णा भुमरे (पंचायत समिती सदस्य), आशोक
भावले(माजी सरपंच), भिमराव ढाकणे (सरपंच ब्राम्हणगाव), भाऊसाहेब वाघ यांची
प्रमुख उपस्थित होती. 
या कार्यक्रमात येथील तिन वर्षा पर्यंत शिक्षण घेवुन मोमीना ही पदवी
मिळविणारया व मदरशात शिवणकाम चे शिक्षण घेवुन कोर्स पुर्ण करणारया 35
विद्यार्थींनीना मोफत शिलाई मशिनचे वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात
आले. यावेळी येथील विद्यार्थींनी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
उत्कृष्ठरित्या सादर करुन मान्यवरांची मने जिंकली. यावेळी मदरशाचे नाजीम
कारी शमशुद्दीन, कासमभाई पठाण, शेख आजीम, आसेफ पठाण, शेख जहिर,
शेख मुस्तकीम, हारुण पठाण, शेख एजाज, रऊफ आत्तार, मुनाफ बागवान
यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन आडुळ ता.पैठण येथील मदरसा अल बनात आयेशा सिद्दिका येथील 35 विद्यार्थींनींना मोफत शिलाई मशिनचे वाटप करतांना हजरत गुलाम मोहम्मद वस्तान्वी व मान्यवर (छायाचिञ शेख मुनाफ)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें