नॅशनल एज्यूकेशन सोसायटीचा स्तुत्य उपक्रम सिल्लोड येथे मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन ;
सामूहिक विवाहात आमदार अब्दुल सत्तार यांच्या कन्येचा हाेणार विवाह.
शेख कलीम
सिल्लोड ( प्रतिनिधि ) दि.21, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून गेल्या चाैदा वर्षापुर्वी सिल्लोड येथे सुरु करण्यात आलेल्या मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे सालाबादाप्रमाणे याही वर्षी आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्या मार्गदर्शनखाली व नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोडच्या वतीने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २२ एप्रिल रविवार रोजी सिल्लोड शहरातील जमालशाह कॉलनी भागातील नॅशनल उर्दू हायस्कूलच्या मैदानात हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार असणार असून अक्कलकुवा येथील मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी हे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे .कार्यक्रमास प्रमुख अतीथी म्हणुन काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष खासदार अशाेकराव चव्हाण, विधानसभेचे विराेधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील विधान परीषदेचे उपसभापती माणीकराव ठाकरे,माजी जिल्हा परीषद अध्यक्ष प्रभाकरराव पालाेदकर , यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री व पुढारी व सिल्लोड येथील सलीममियॉ मदरसा चे मौलाना मूसा साहब वस्तानवी, हाफिज मो. ईलियास रियाजी, मौलाना रफीक दानापुरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
गेल्या दहा वर्षापासून सिल्लोड येथे माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतुन व नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नवीन दांपत्यास संसार उपयोगी साहित्य तसेच येणाऱ्या पाहूण्यामंडलींसाठी जेवण , पाणी इत्यादि आदरतिथ्य आयोजकांच्या वतीने करण्यात येते. गेल्या काळात हजारो मुस्लिम तरुणांनी या सोहळ्यात आपला निकाह केल्याने त्यांची आर्थिक बचत झाली. लग्नासाठी होणारा खर्च त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात कामी आला. मागील काळात हजारो युवकांचा विवाह या सोहळ्यात संपन्न झाला. यावर्षी 555 जणांचा विवाह या इज्तेमाई शादियाँ मध्ये हाेत असून माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या कन्येचा विवाह या साेहळ्यात हाेणार आहे.
चौकट
माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम अंतर्गत मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे ( इज्तेमाई शादियाँ ) आयोजन करण्यात येते. 1 जानेवारी या आ. अब्दुल सत्तार यांच्या जन्मदिवशीच् या सोहळयाची तारीक ठरते. जानेवारी महिण्यात कमी प्रमाणात लग्न होत असल्याणे एप्रिल महिन्यात या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा विवाह याच सामूहिक सोहळ्यात झाला होता. यामुळे एक सकारात्मक सन्देश या माध्यमातून तरुण वर्गात गेल्याने सामूहिक विवाह सोहळयाची प्रेरणा मोठ्या प्रमाणात समाजास मिळाली आहे.
काेट:=माझी आर्थीक परीस्थीती ठीक आहे.इतर पुढार्याप्रमाणे माझ्या मुलीचा विवाह मी शाही पध्दतीने करु शकताे.पण संपत्तीचे असे अवडंबर माझ्या बुध्दीला पटत नाही.सध्दा राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे.सरकार कडून शेतकर्यांची कर्जमाफी विषयी थट्टा केली जात आहे.बेराेजगारी वाढली आहे.जनतेची आर्थीक परीस्थीती चांगली नसतांना आपन विवाह साेहळ्याची उधळपट्टी करने याेग्य नाही.:=माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें