"झी टॉकिज मराठी"वर शेळगाव येथील तरुनाचा सहभाग. =किर्तनकारास देतोय मृदंगवादनाची साथ. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 2 अप्रैल 2018

"झी टॉकिज मराठी"वर शेळगाव येथील तरुनाचा सहभाग. =किर्तनकारास देतोय मृदंगवादनाची साथ.

"झी टॉकिज मराठी"वर शेळगाव येथील तरुनाचा सहभाग.

=किर्तनकारास देतोय मृदंगवादनाची साथ.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०२एप्रिल  २०१८

झी टॉकीज मराठी या वाहिनीवर सध्या दररोज सकाळी *गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा* या किर्तन मालीकेचे प्रसारन चालू आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक अभ्यासू व नामवंत किर्तनकार सेवा देत आहेत. आज (दि.०२  एप्रिल) पासून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प.रामायनाचार्य विशाल महाराज बडे यांच्या मधुर वाणीतुन किर्तन सेवा दररोज सकाळी ०७.३० ते ०८.३० या वेळात चालू झाली आहे. या किर्तनसेवेत प्रसिद्ध मृदंगाचार्य श्री ठाकरे महाराज यांचे शिष्य, सोनपेठ तालूक्यातील शेळगाव येथील ह.भ.प. सुदर्शन महाराज जोगडे यांची किर्तनकारास मृदंगसाथ लाभत आहे. ग्रामीण भागातुन परीश्रमाणे अशा मोठ्या कार्यक्रमास सहभागी होण्याचा बहुमान शेळगांव येथील तरूनास मिळाला आहे. त्याची ही सेवा सर्वांनी पाहून त्याचे उत्साहवर्धन करावे अशी विनंती परिवारातून करण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें