नगरपालिका प्रशासनाने पाणीपट्टीत केले दुप्पटीने वाढ
-पाणी पुरवठा सुरळीत व स्वच्छ पाणी मिळणार का?
पठाण अज़मत.(जिंतूर): नगरपालिका प्रशासनाने प्रारंभीच्या शिल्लक रक्कमेसह २०१८-१९ या वर्षाचा ७२ कोटी ३९ लाख ३० हजार ४९७ रूपयांचे अंदाजपत्रक सादर केले यात ३१ हजार १२६ रूपयांची शिल्लक दर्शिवली आहे यावेळी आनलाईन बांधकाम परवाना बेटरमेंटचार्जेसमध्ये मोठी वाढ केली आहे. तसेच घरगुती व कमर्शियल पाणीपट्टीमध्ये व पालीकेच्या गाळे भाड्यात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.
नगराध्यक्षा व स्थायी समितीच्या अध्यक्षा सौ सबीयाबेगम कफिलफारूकी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सर्व विषय समित्यांचे पदाधिकारी , सदस्य व विभाग प्रमुख उपस्थिती नगरपालिकेच्या सभागृहात विशेष अर्थसंकल्पीय सभा घेण्यात आली सभेत स्थायी समितीने मंजूर केलेला अर्थसंकल्प मुख्याधिकारी जयंत सोनवणे यांनी चर्चेसाठी सभागृहासमोर ठेवला लेखापाल डि.बी.मोरे यांनी त्याचे वाचन केले .सभागृहातील साधक बाधक चर्चेअंती अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.
सदरील अंदाज पत्रकात सुरवातीची शिल्लक ६१लाख ४७ हजार९११ रुपये जमा होण्याचे गृहीत धरलन्यात आले आहे.२०१६-१७ या वर्षाच्या तूलनेत या अर्थसंकल्पात तिनपटीपेक्षा अधिक उत्पन्नवाढ गृहीत धरण्यात आली असून यावेळी आनलाईन बांधकाम परवाना बेटरमेंटचार्जेस मध्ये मोठी वाढ केली आहे. तसेच घरगूती व कमर्शियल पाणीपट्टीमध्ये,पालीकेच्या गाळे भाड्यात दुपटीने वाढ करण्यात आली तर खर्च ७२कोटी ३२ लाख ३० हजार ४९७ अपेक्षित असल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकात ३२ हजार २२६ रुपये अखेरची शिल्लक दर्शवीण्यात आली आहे. येलदरी धरनातुन शहराच्या पाणी योजनेसाठी धरनातुन शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी घेण्यात येत असलेल्या पाण्याचा कर वीजबिल वेळोवेळी पाईपलाईन दुरूस्ती कर्मचाऱ्यांचे वेतन यामुळे पाणी पुरवठा विभागात खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे तो भागविण्यासाठी पालीकेला पाणीपट्टी वाढ करणे अपरिहार्य असल्याचे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक कफिलफारूकी म्हणाले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें