डोळ्यात नाही तर गावात पाणी निर्माण करण्याचा निर्धार करा--- राहुल कर्डीले - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 1 अप्रैल 2018

डोळ्यात नाही तर गावात पाणी निर्माण करण्याचा निर्धार करा--- राहुल कर्डीले

डोळ्यात नाही तर गावात पाणी निर्माण करण्याचा निर्धार करा--- राहुल कर्डीले.


तालुक्यातील सोस येथे गावकऱ्यांचा गाव पाणीदार करण्याचा संकल्प


जिंतूर प्रतिनीधी
गावकऱ्यांनी गावात लोकसहभाग वाढवून गाव पाणीदार करून पाण्यासाठी डोळ्यात पाणी अनन्या एवजी गावात पाणी निर्माण करण्याची गरज असल्याचे मत सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सोस येथे पाणी फाउंडेशन व गावकऱ्यांच्या वतीने 1 एप्रिल रोजी आयोजीत करण्यात आलेल्या शोष खड्याच्या कामाचे शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले..
यावेळी तहसीलादर सुरेश शेजुळ,सरपंच दादाराव शिंदे,निवृत्त शिक्षक आसारामजी शिंदे,पाणी फाऊंडेशनचे समन्वयक गायकवाड व गावातील जेष्ठ नागरीक उपस्थित होते यावेळी गावात शोष खड्डे तयार करण्याचे उदघाटन करण्यात आले तसेच गावात चालू असलेल्या कामाची शिवार फेरी काढून गावशिवाराची पाहणी केली  यावेळी पुढे बोलतांना कर्डीले म्हणाले की, येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही यासाठी गावकऱ्यांनी लोकसभाग वाढवून पावसाळ्यात वाया जाणाऱ्या पाण्याचे गावात व शेतात योग्य नियोजन केल्यास कधीच पाणी टंचाईला सामोरे जाण्याची गरज राहणार नाही म्हणून गावकऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी डोळ्यात पाणी अनन्या ऐवजी गावात पाणी निर्माण करण्याचा निर्धार करा
असे ही यावेळी ते म्हणाले दरम्यान पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या युवकांनी गावात चालू असलेल्या कामाची माहिती दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत मगर,सोमेश्वर उदावंत,संतोष शिंदे,महादेव शिंदे,भगवान पाटील,शेख चांद पाशा,ज्ञानोबा शिंदे आदी गावकऱ्यांनी पर्यंत केले..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें