मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे शेतकऱ्यांची आत्महत्या ! + तालुक्यातील अन्नदाताच्या आत्महत्या काही थांबता थांबेना ....... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 1 अप्रैल 2018

मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे शेतकऱ्यांची आत्महत्या ! + तालुक्यातील अन्नदाताच्या आत्महत्या काही थांबता थांबेना .......

मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे शेतकऱ्यांची आत्महत्या !

+ तालुक्यातील अन्नदाताच्या आत्महत्या काही थांबता थांबेना .......

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०१: मानवत  तालुक्यातील ताडबोरगाव येथील शेतकरी  दत्ताराव सोपानराव  शेळके वय ६५ या शेतकऱ्यांनी सतत होत असेलेल्या नापिक व शेती पिकवनाण्या साठी घेतलेले  कर्ज कसे फेडायचे  या चिंतेने १ एप्रील रोजी सकाळी ५ वाजता स्वताच्या  शेतात लिंबाच्या झाडाला दोरफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची मानवत पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे शेतकरी दत्ताराव सोपानराव  शेळके याला ताडबोरगावात दोन एकर शेत   जमीन आहे गेल्या काही वर्षां पासुन शेतातील नापीक होत आहे पिक  हातात येत नसल्याने चिंता ग्रस्त होऊन सतत शेतातील झालेल्या खर्चाची  रक्कम कशी फिटणार या चिंतेने व बँकेच्या कर्ज कसे फिटणार या चिंतेने आखेर प्राण गमवावा लागला आहे शेवटी आपल्याच शेतात आपल्या प्राणाचा शेवट शेतातील लिंबाच्या झाडाला दोर फास घेऊन प्राण सोडावालागला . ताडबोरगाव शिवारात गट नं. १४३ मध्ये त्यांच्या  नावे ७६ आर शेती आसुन या शेतीवर मानवत येथिल बँक अॉफ इंडिया मानवत शाखेचे  कर्ज  घेतलेले आसुन हे कर्ज  कसे फेडावे हा प्रश्न  त्यांना पडला होता . त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परीवार आहे मानवत तालुक्यात होतअसलेल्या सारख्या अत्महात्या या कडे जिल्हा प्रशासन काही दखल घेत नसल्याचे दिसत आहे या  मुळे मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश यात शेतकऱ्यांच्या लेकरावरील मायेची सावली जात आसल्याने एक तर अत्महात्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या संसाराची सुरती पुरती रांगोळी होत आहे यांची दखल युती सरकार घेत नसल्याने मानवत तालुक्यातील आनखी किती शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडते असा प्रश्न  शेतकऱ्यांचा घरातील महिला व मुलांना पडला आह आहे यामुळे शेतकऱ्यांचे समुपदेषन करण्याची गरज असुन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासुन परावृत्त करण्याची आवश्यकता आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें