तीन तलाक बिल विरोधात सोमवार रोजी सेलु येथे मुस्लिम महिलाचे मोर्चाचे आयोजन.
सेलू : ( प्रतिनिधि )केंद्र शासनाने मुस्लीम कायद्यात ( शरीयत ) हस्तक्षेप करत तीन तलाक पध्दत संपुष्टात आणण्याकरीता एक कायदा केला असुन तो कायदा लोकसभेत मंजूर करण्यात आला आहे. सदरील कायदा हा चुकीचा असून तो रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या आव्हानानुसार सेलू येथे उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक ९ एप्रिल सोमवार रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान मुस्लिम महिलांतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त मुस्लिम महिलांनी सहभागी व्हावे असे आव्हान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने करण्यात आहे आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें