बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 5 अप्रैल 2018

बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना.

बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना.

प्रतिनिधी.
पुतळा विटंबणेचे लोण आता गावाकडेही सुरू झाले असून बुलढाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यातील पाचला या गावी मंगळवारी रात्री अज्ञात समाज कंटकांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. पाचला या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर आरुढ पुतळा आहे, तरसमोर दोन मावळे उभे आहेत. अज्ञात समाजकंटकांनी मंगळवारी रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तोंडाला रंग लावला व समोर उभ्या मावळ्यांना सुद्धा रंग लावला. हा प्रकार सकाळी गावकऱ्यांनी बघितल्यानंतर एकच खळबळ असून लोकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे.खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने तहसीलदार संतोष काकडे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, रिपाइंचे नेते मधुकर गवई मुरलीधर गवई, जिल्हा परिषद सदस्य आशिष राहाटे, पत्रकार सिध्देश्वर पवार, पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, ठाणेदार राहुल मोरे आदी सकाळी पाचला गावात पोहोचले असून त्यांनी गावकऱ्यांना शांत केले व छत्रपतींच्या मूर्तीस दुधाने अभिषेक करून स्वच्छ केले. बुधवारी पाचला येथील पोलीस पाटील संजय जनार्धन गवई यांच्या फिर्यादीवरून जानेफळ पोलिसांनी अज्ञात समाज कंटकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल मोरे व हेड कॉन्स्टेबल दिलीप गवई करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें