शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे, मग तुम्ही स्वतः दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय?, शिवसेनेचा अजित पवारांवर निशाणा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 5 अप्रैल 2018

शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे, मग तुम्ही स्वतः दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय?, शिवसेनेचा अजित पवारांवर निशाणा.

शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे, मग तुम्ही स्वतः दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय?, शिवसेनेचा अजित पवारांवर निशाणा.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विखारी शब्दात टीका केली आहे. शिवसेनेला गांडुळाची उपमा देणारे अजित पवार हे छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे. सत्तेच्या खुर्च्या उबवून स्वत:चं हित पाहाणाऱ्या अजित पवारांचे महाराष्ट्रासाठी योगदान काय असा सवाल सामना संपादकीय मधून उपस्थित करण्यात आला आहे. गांडुळास दोन तोंडे आहेत की चार तोंडे याचा शोध नंतर लावू, पण तुम्ही मात्र रावणाप्रमाणे दहा तोंडांनी बोलत असता. प्रश्न इतकाच आहे की, शिवसेनेने सत्तेत राहून काय केले असा प्रश्न तुम्हाला आता पडाला आहे, पण इतकी वर्षे सत्तेच्या खुर्च्या उबवून फक्त स्वतःचे हित साधण्यापलीकडे आपले महाराष्ट्रासाठी नक्की योगदान ते काय? शेतकरी हक्काचे पाणी मागायला तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही त्यांना ‘मूत्र’ पाजण्याची भाषा केलीत. हेच तुमचे शेतकरीप्रेम! मग त्या अर्थाने  तुम्हाला दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असं म्हणावे लागेल, अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली आहे.सामना संपादकीय मध्ये म्हटलं आहे की, अजित पवार यांचे राजकारण आता बारामती पुरते सुद्धा उरलेले नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी अजित पवारांना जवळजवळ माती खायला लावलीच होती. अनेक दिवस ते त्या मातीत गाडलेले आपले तोंड बाहेर काढायला तयार नव्हते. महापालिका निवडणुकीत पुणे व पिंपरी-चिंचवडचे संस्थानही धुळीस मिळाले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदही राहिलेले नाही. त्यांच्या पक्षाचा जीर्ण सांगाडा झाला आहे. तरीही हे सांगाडे ‘हल्लाबोल’ यात्रेच्या नावाखाली उसने अवसान आणत आहेत हा विनोदच म्हणायला हवा. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवारांचीपत ती काय, पण तरीही त्यांच्या जिभेचा गांडूळ अधूनमधून वळवळत असतो.
कालच त्यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेची संभावना ‘गांडुळाची अवलाद’ अशी केली. शिवसेनेच्या गांडुळाचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही असे ते म्हणाले. आता आमच्या गांडुळाचा मुका घेण्याचा प्रयत्न अजित पवारांनी कधी केला हे त्यांनी एकदा सांगून टाकावे. अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी गांभीर्याने घेत नाही. त्यांना जो काही मानसन्मान आतापर्यंत मिळाला तो त्यांच्या आदरणीय काकांमुळे. पण काकांनी संपूर्ण संधी व पाठबळ देऊनही अजित पवारांना नेतृत्व उभे करता आले नाही. कारण त्यांचे तोंड व जीभ म्हणजे भ्रष्ट गटार आहे व येणाऱ्या-जाणाऱ्यांवर त्यांच्या गटारी तोंडाने थुंकून ते घाण करीत असतात. काकांनी पन्नास वर्षांत कमावले ते अजित पवारांनी अल्पावधीत गमावल्यामुळेच शरद पवारांना ७५ व्या वर्षीसुद्धा पक्ष बांधणीसाठी वणवण करावी लागत आहे. अजित पवार म्हणतात की, शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे. मग काय हो अजितराव, तुम्ही स्वतः दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय? गांडूळ हा निदान शेतकऱ्यांचा मित्र तरी आहे. गांडुळास दोन तोंडे आहेत की चार तोंडे याचा शोध नंतर लावू, पण तुम्ही मात्र रावणाप्रमाणे दहा तोंडांनी बोलत असता. प्रश्न इतकाच आहे की, शिवसेनेने सत्तेत राहून काय केले असा प्रश्न तुम्हाला आता पडाला आहे, पण इतकी वर्षे सत्तेच्या खुर्च्या उबवून फक्त स्वतःचे हित साधण्यापलीकडे आपलेमहाराष्ट्रासाठी नक्की योगदान ते काय? शेतकरी हक्काचे पाणी मागायला तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही त्यांना ‘मूत्र’ पाजण्याची भाषा केलीत. हेच तुमचे शेतकरीप्रेम! मग त्या अर्थाने  तुम्हाला दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असे म्हणावे लागेल. जो गुन्हा छिंदमने केला तोच गुन्हा मंत्रीपदावर असताना तुम्ही तेव्हा केला. सत्तेत असताना काही केले नाही व विरोधी पक्षात असतानाही तोंडास बूच मारूनच बसले. शेतकऱ्यांच्या  कर्जमाफीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवर असल्यापासूनच शिवसेना रान उठवीत आली व भाजप सत्तेवर आला तरी शिवसेनेने कर्जमुक्तीचा नारा सोडला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आवाज चढवून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शिवसेनेने करून घेतली आणि सत्तेत असून महाराष्ट्राच्या व जनतेच्या हितासाठी आवाज उठविण्याचे काम शिवसेनाच एका कर्तव्यभावनेने करीत असते. जेव्हा तुम्ही सलग १५ वर्षेसत्तेत खुर्च्या उबवीत होता तेव्हा तुम्ही महाराष्ट्रहिताचे काय दिवे लावले? जमीन घोटाळे व पाणी घोटाळे याशिवाय तुम्ही काय केलेत? पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना जलसंधारण 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें