पाथरी येथे भारिपच्या वतीने तहसील कार्यालया समोर घंटानाद आंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 3 अप्रैल 2018

पाथरी येथे भारिपच्या वतीने तहसील कार्यालया समोर घंटानाद आंदोलन.

पाथरी येथे भारिपच्या वतीने तहसील कार्यालया समोर घंटानाद  आंदोलन.


पाथरी / प्रतीनिधी
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी   संभाजी भीडे यांना अटक करण्यात यावी या मागणीसह  इतर मागण्यासाठी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मंगळवार ३  एप्रील रोजी पाथरी तहसिल कार्यालया समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
  1 जानेवारी हजारो आंबेडकरी अनुयायी भीमा कोरेगाव येथील विजयी स्थंभास अभीवादन करण्यासाठी गेले असतांना भीमा कोरेगाव पासुन जवळच असरलेल्या सनसवाडी या ठिकाणी दंगल घडली होती या दंगलीत भीमा कोरेगाव येथे अभीवादन करण्यासाठी आलेल्या भीम सैनीकावर अमाणूष पणे दगडफेक करुन अनुयायींच्या अनेक गाड्यांची तोडफोड करून गाड्यांचे नुकसान करण्यात आले होते या दगडफेकीत मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयाई जखमी झाले होते. या दंगलीतील घटनेचे प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप ठेऊन मनोहर ऊर्फ संभाजी भीडे आणी मिलींद एकबोटे यांना जिम्मेदार धरण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते.काही दिवसा पुर्वी या घटनेतील मिलींद एकबोटे यांना आटक करण्यात आली आहे. मात्र याच घटनेतील संभाजी भीडे यांना अद्याप आटक करण्यात आलेली नसल्यामुळे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी  गुरुवार 26 मार्च रोजी मुबंईत भव्य मोर्चा काढण्यात आला परंतू अद्यापही संभाजी भीडे यांना अटक करण्यात आली नसल्याने संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी या मुख्य मागणीसह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व इतर मागण्यांसाठी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरूनभारीप बहूजन महासंघ , भारीप बहूजन युवा आघाडी , सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने पाथरी तहसील कार्यालया समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले या आंदोलनात भारिप नेते प्रकाश उजागरे,प्रविन कनकुटे जि.अध्यक्ष परभणी,आवडाजी ढवळे,अॅ.आशोक पोटभरे ता.अध्यक्ष पाथरी,विश्वनाथ थोरे,दिलीप ढवळे,आनंत कांबळे युवा जि.उपअध्यक्ष परभणी,श्रिरंग पंडीत,महादेव गायखवाड,शुध्दोधन शिंदे,टि.एम.शेळके,दिपक जमदडे विधान सभा निरिक्षक पाथरी,गौतम साळवे,प्रताप साळवे ता.अध्यक्ष आर.पि.आय.पाथरी,कुमार भालेराव युवा ता.अध्यक्ष पाथरी आदी उपस्थीत होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें