ग्रीन वूड इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांनाचा सायन्स ओलांपियाड परीक्षेत यश.
शे.सलिम.भोकरदन प्रतिनिधी : शहरातील रफिक कॉलनी येथील ग्रीन वूड इंग्लिश शाळेतील विद्यार्थी सायन्स ओलांपियाड फाऊंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत चमकले.या शाळेतील विद्यार्थिनी अफशा शेख साबेर हिने राष्ट्रीय पातळीवर ६९ रैन्क सेक्युरमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर शेख अलविरा व सय्यद जुनेरा मरियम जाकेर ने दुसरा क्रमांक तर अरविंद गणेश सोनवने या गरीब विध्यर्थ्यांने आपल्या गरिबीवर मत करून शाळेत तृतीय क्रमांक पटकावला आहे आणि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनी व विध्यार्थ्यांना मेडल व प्रमानपत्राचे वाटप करण्यात आले.व शाळेत ई-लर्निंग लॅबचा उदघाटन केंद्र प्रमुख सोनवणे सर यांच्या हस्ते करण्यात आले.केंद्र प्रमुख सोनवणे सर व नगरसेवक कदिर बापू यांनी विद्यार्थिनी व विध्यर्थ्यांना ई-लर्निंग व पुढील शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी उपनगराध्यक्ष इरफानोद्दीन सिद्दीकी,केंद्र प्रमुख सोनवणे सर,माजी.उपनगराध्यक्ष रिझवान भाई,नगरसेवक नसीम पठाण, कदिर बापू,राहुल दुबे सर,कुद्दुस सर, संस्था सचिव फेरोज पठाण, महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे ता.अध्यक्ष सलीम शेख शेख नदीम,जावेद शेख,इम्रान सर,चाँद हाजी,अफसर शाहा,साबेर सर,सय्यद शाकेर,गणेश सोनवणे व शाळेतील विद्यार्थिनी ,विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग आदि उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें