मोरेगाव येथे रंगली कुस्त्यांची दंगल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 3 अप्रैल 2018

मोरेगाव येथे रंगली कुस्त्यांची दंगल.

मोरेगाव येथे रंगली कुस्त्यांची दंगल.

सेलु(प्रतिनिधि):तालुक्यातील मोरेगाव येथे मोरेश्वरी यात्रेनिमित्त भव्य कुस्त्याची दंगल रंगली. रविवार 1 एप्रिल रोजी कुस्तीस्पर्धेचे उद्घाटन जि. प. सदस्य राजेंद्र लहाने यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता करण्यात आले. यावेळी जनार्दन मगर, विनायक खंडागळे, तुकाराम मगर, बापु डासाळकर, गंगाधर लोंढे, पंडितराव वाघ, ताठे आदींची उपस्थिती होती. यावेळी लहान मोठ्या कुस्तीपट्टुनी हजेरी लावली होती. तर स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक भाटेपुरी(जि.जालना) येथील कुस्तीपटु गणेश पहेलवान यांनी पटकावले. पंच म्हणुन विठ्ठल आकात यांनी काम पाहिले. तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्याम मगर, राजेभाऊ मगर, लक्ष्मण खंडागळे, कुशाल डासाळकर, सुंदर लोंढे आदींनी पुढाकार घेतला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें