श्री म्हसोबा महाराज यात्रा साठी नगर परिषद सज्ज - नगराध्यक्ष अब्दुल समीर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 3 अप्रैल 2018

श्री म्हसोबा महाराज यात्रा साठी नगर परिषद सज्ज - नगराध्यक्ष अब्दुल समीर.

श्री म्हसोबा महाराज यात्रा साठी नगर परिषद सज्ज - नगराध्यक्ष अब्दुल समीर.

आजय बोराडे.
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि. सिल्लोड शहराचे आराध्य दैवत श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्रा महोत्सवानिमित्त नगर परिषदेच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी नगर परिषदेने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी दिली.

 यात्रे निमित्त नगर परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाची नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी मंगळवार ( दि.3) रोजी यात्रा स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली .यावेळी उपनगराध्यक्ष शकुंतलाबाई बन्सोड, नगर सेवक रईस मुजावर, वीज वितरण विभागाचे सुधांश वडरवार, सिल्लोड सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बन्सोड, खरेदी विक्री संघाचे संचालक संजय मुरकुटे, दत्ता शेजुळ, फाईम पठाण, दीपक वाघ, जगन्नाथ कुदळ, अमोल बोराडे, किरण बन्सोड आदींसह नगर परिषदेचे अधिकारी - कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
   यावेळी माहिती देतांना नगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले की,  श्री म्हसोबा महाराज यांचा यात्रा महोत्सव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. यात्रा उत्सव काळात जवळपास 1 लाख भाविक दर्शनासाठी सिल्लोड येथे येतात. त्या अनुषंगाने नगर परिषदेने भाविकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी बस स्थानक ते मंदिर - यात्रा  परिसरापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई, विद्युत रोषणाई, यात्रा परिसराची स्वच्छता, यात्रा परिसरातील रस्त्यांची डागडुजी,थंड पेय ( शरबत ) ,नवस पूर्तीसाठी आलेल्या भाविकांना टँकर द्वारे पाणी पुरवठा इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी दिली.

यात्रा उत्सव काळात वीज वितरण विभागाने विशेष काळजी घेवून यात्रा पतीसरतील लोमकळलेली वायर , पोल दुरुस्त करण्यात यावे तसेच यात्रा काळात वीज विभागाने नियमित सुरळीत वीज पुरवठा करावा अशी सूचना नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी वीज वितरण विभागाचे श्री वडरवर यांना दिल्यात.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें