आज देश विदेश तेज़्ज़न्युज़24 चालु घडामोडी थोडक्यात.
◼हाफिज सईदला अमेरिकेचा दणका, ‘मिल्ली मुस्लिम लीग’ दहशतवादी संघटना घोषित
◼अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुर्तास कायम; तीन दिवसांत सर्व पक्षकारांना बाजू मांडण्याचे आदेश
◼अॅट्रॉसिटी कायदा सौम्य केल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी नाराज; राष्ट्रपतींकडे सोपवला राजीनामा
◼फेक न्यूजवरील कारवाईचा फतवा अवघ्या 16 तासात मागे, देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाचा निर्णय
◼सीबीएसई दहावी गणिताची फेरपरीक्षा होणार नाही, देशभरातील 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा
◼केदारनाथमध्ये भारतीय हवाई दलाच्या M17 हेलिकॉप्टरचा अपघात.
◼पतीने पत्नीच्या संमतीविना ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरत नाही: हायकोर्ट
◼परभणीचा अवघा २० वर्षांचा जवान शुभम मस्तपुरे पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद
◼भारत बंद : राजस्थानमध्ये तब्बल 1000 लोकांना अटक, समाजकंटकांचा शोध सुरू
◼शिवसेना ही गांडुळाची अवलाद…त्याचं तोंड इकडे की तिकडे कळत नाही – अजित पवार
◼नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांचा शपथविधी सोहळा संपन्न, नारायण राणेंची हिंदीत, तर कुमार केतकरांची इंग्रजीत शपथ
◼‘गावाकडच्या गोष्टी’ वेब सीरीजचे कलाकार ‘कृष्णकुंज’वर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून दखल
◼जोहान्सबर्ग कसोटीत आफ्रिकेचा मोठा विजय, ऑस्ट्रेलियावर तब्बल 492 धावांनी मात.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें