सावधान! सावधान! राज्यात गारपीट होण्याची शक्यता.
विशेष.प्रतिनिधी.
राज्यात येत्या शुक्रवार व शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने याठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान याच काळात जालना, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यातही गारपीट होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें