सिद्धार्थ कदम याचे यश
सेलू :- रॅशनालिस्ट टॅलेन्ट सर्च 2018 या परीक्षेमध्ये सेलू येथील सिध्दार्थ बळीराम कदम या विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन केले असून सदर परीक्षेत त्याने राज्यातून 30 वा क्रमांक, जिल्ह्यातून 22 वा क्रमांक तर तालुक्यातून दुसरा क्रमांक मिळविला आहे. सिद्धार्थ कदम हा येथील नुतन विद्यालयात इयत्ता 9 वी वर्गात शिक्षण घेत असून रामराव गायकवाड या शिक्षकाचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या यशाबद्दल ग्राहक संरक्षण परिषदेचे डाॅ. विलास मोरे, ऋषिकेश कदम, संतोष गात, सुधाकर खैरे, वसंत गात, व आई, वडील, आजी यांनी कौतुक केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें