अजींठा गावच्या विकासासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातुन दाेन काेटी रुपयांचा निधी
सिल्लाेड दि.३१(प्रतिनिधि)अजींठा(ता.सिल्लाेड) गावच्या विकासासाठी विशेष बाब म्हणुन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातुन दाेन काेटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. प्रादेशिक पर्यटन याेजनेतुन या कामास मंजुरी मिळाली आहे.
पर्यटन स्थळांच्या ठिकानी पायाभुत साेयी सुविधा पुरवविन्यासाठी प्रादेशिक पर्यटन याेजनेतुन सन २०१७/१८ मधे सिल्लाेड तालुक्यातील अजींठा प्रमुख राज्य मार्ग ते अजींठा लेणीकडून अजींठा गावातुन पारुच्या समाधीकडे जानार्या तीन कि.मी.रसत्याचे बांधकाम करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी शासनाकडुन विशेष बाब म्हणुन दाेन काेटी रुपयांचा निधी मंजुर करवुन घेतला.
तालुक्यात अजींठा गावास जागतीक वारसा लाभलेला आहे.जागतीक दर्जाची अजींठा लेणी याच गावच्या नजीक आहे.यामुळे अजींठा गावची विशेष ओळख आहे.ही बाब लक्षात घेत अजींठा गावचा सर्वांगीन विकास व्हावा हा प्रयत्न आमदार अब्दुल सत्तार करत असतात.मतदार संघातील जागतीक ओळख निर्माण झालेल्या अजींठा गाव व परीसराचा विकास प्रक्रिया कायम सुरु राहनार असल्याची ग्वाही आमदार सत्तार यांनी दिली आहे.तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळ ,धार्मीक स्थळे विकसीत करण्यासाठी शासनाकडून भरघाेष निधी यापूर्वीही दिला असून यापुढेही विकासासाठी निधी कमी पडू देनार नसल्याची माहीती त्यांनी दिली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें