सिल्लोड येथे महापुरुषांच्या जयंती निमित्त गटाई काम करणाऱ्यांना छत्रीचे वाटप.
शेख इस्माईल सिल्लोड(प्रतिनिधी)
सिल्लोड येथे चक्रवर्ती सम्राट अशोक, छ.शिवाजी महाराज , महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बहुजन नायक कांशीराम या महापुरुषांच्या जयंती निमित्त बहुजन समाज पक्षातर्फे सिल्लोड येथे गटाई काम करणाऱ्यांना त्यांचे ऊन , पाऊसा पासून संरक्षण व्हावे यासाठी छत्री वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाला बसपा प्रचारक जागिदशदादा बेदवे ,बसपा शहराध्यक्ष शेख अक्रम यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात सर्व प्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .जगदीशदादा बेदवे, अकरम शेख ,यांनी यावेळी फुले, शाहू आंबेडकर चळवळी विषयी व बसपाच्या कार्या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन क्रुश्णा वाघ यांनी तर आभार संतोष गायकवाड यांनी मानले.कार्यक्रमास युवराज तायडे(बसपा कार्यकर्ते) पत्रकार राजू रोजेकर यांच्या सह बसपा कार्यकर्ते व पदाधिकारी, गटाई कामगार व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें