माजी सरपंच प्रभाकरअप्पा तोंडारे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त ग्रंथतूला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 1 अप्रैल 2018

माजी सरपंच प्रभाकरअप्पा तोंडारे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त ग्रंथतूला.

माजी सरपंच प्रभाकरअप्पा तोंडारे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त ग्रंथतूला.

+दहा शाळांना भेट दिली पुस्तके


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०१एप्रिल २०१८

सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्या वतीने अनेक शाळा महाविद्यालयां मध्ये ग्रंथदान  करण्याचा उपक्रम राबविला आहे. अशाच प्रकारचा ग्रंथदानाचा उपक्रम आज परळी वैजनाथ तालूक्यातील नागापूर येथे माजी सरपंच व सामाजीक कार्यकर्ते तसेच शैक्षणीक व धार्मिक कार्यात आग्रेसर असलेले प्रभूआप्पा तोंडारे यांच्या (अमृत महोत्सव) ७५व्या  वाढदिवसा निमित्त राबविण्यात आला.
नागापूर येथे प्रभूअप्पा तोंडारे यांची कुटुंबिय व आप्तेष्ठांच्यावतीने त्यांच्या ७५व्या वाढदिवसा निमित्त दि.०१एप्रिल २०१८ रोजी स्थानिक श्री नागनाथ मंदिर येथे ग्रंथतुला व शर्करातुला करण्यात आली. ग्रंथ तुलेतील पुस्तके परळी वैजनाथ व अहमदपुर तालूक्यातील दहा शाळा, महाविद्यालयांना देण्यात आली.
यावेळी कल्पनाताई सोळंके सभापती पंचायत समिती परळी वै. मोहनराव सोळंके सरपंच नागापूर, संतोष पाटील सोळंके भाजपा तालूकाध्यक्ष परळी वै., पणन महासंघाचे सदस्य अँड. विष्णुपंत सोळंके, गणपतअप्पा तोंडारे, नागनाथ मंदीर देवस्थानचे सचिव कुंडलीकराव सोळंके, सुधाकरअप्पा तोंडारे, रमेश तोंडारे, राजेश्वरअप्पा महाजन, शिवहरअप्पा गव्हाणे, नंदकुमार स्वामी, सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर, सदस्य बाबासाहेब गर्जे, मल्लिकार्जुन सौंदळे, पत्रकार देवानंद सौंदळे, योगिराज तोंडारे, रमेश तोंडारे, वैजनाथ आगरे, संतोष खानापूरे, अंतेश्वरअप्पा नरवणे आदींसह तालूक्यातील व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें