शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 3 अप्रैल 2018

शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात

शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात

+रिलायन्स जनरल पिक वीमा इन्शुरन्स कंपनीवर गुन्हा दाखल करन्याची मागणी


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०३एप्रिल २०१८

खरीप हंगामातील पिकाचा विमा भरूनही रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना विम्याचा लाभ दिला नाही याबद्दल संबंधीत विमा कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन शिवाजीराव कदम जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड परभणी यांनी सोनपेठ पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक सोपानराव शिरसाट यांच्याकडे दिले आहे.
खरीप हंगाम २०१७ मध्ये परभणी जिल्हा व सोनपेठ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन पिक वीमा भरलेला असतानाही व सर्व शेतकरी विमा मिळण्यास पात्र असतानाही सदरील विमा कंपनीने फसवणूक केली आहे.
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा शासनाशी करार केलला असतानाही शेतकऱ्यांची फसवणूक व विश्वासघात केला आहे. गुन्हा दाखल नाही झाला तर न्यालयात जाऊन गुन्हा दाखल करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेड आघाडीवर राहील असे संभाजी ब्रिगेडचे परभणी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कदम यांनी यावेळी बोलतांना सांगीतले.
यावेळी सुरेशभाऊ भोसले, केशव भोसले, अशोक भोसले, मारोती सपकाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें