Parabhaṇīcā avaghyā 20 varṣācā javāna śubhama mastapurē pākisatānacyā gōḷībāḷāta śahid.
परभणीचा अवघ्या 20 वर्षाचा जवान शुभम मस्तपुरे पाकिसतानच्या गोळीबाळात शहिद.
प्रतिनिधी,परभणी.
जम्मू- काश्मीरमधील कृष्णा घाटी येथे सीमा रेषेवर पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात भारतीय सैन्यातील एक जवान शहीद झाला. शुभम मस्तपुरे (वय २०) असे या जवानाचे नाव असून ते परभणीतील कोनरेवाडी गावचे निवासी होते.
सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून मंगळवारी सकाळी पाकने कृष्णा घाटी येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकच्या गोळीबारात सैन्यातील जवान शुभम सूर्यकांत मस्तपुरे हे शहीद झाले. शुभम यांच्या पश्चात आई सुनिता असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुभम मस्तपुरे हे सैन्यातील धाडसी जवान होते. देशासाठी त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील, असे सैन्याने म्हटले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें