भारिप बहुजन महासंघ भोकरदन च्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन.
शे.सलिम.भोकरदन (प्रतिनिधि ): येथील उपविभागीय कार्यालय समोर तालुका व शहर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने भारिप ता. अध्यक्ष प्रदीप जोगदंडे यांच्या नेतृत्वाखालि घंटानाद आंदोलन करण्यात आले.भारिप बहुजन महासंघा तर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व झोपेचे सोंग घेतलेल्या दळभद्र्या सरकार ला झोपेतुनजागे करण्यासाठी भारिप बहुजन महासंघ च्या वतीने भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दि.03 एप्रिल 2018 रोजी घंटानाद अंदोलना करण्यात आले आहे,संघटने तर्फे दिलेल्या निवेदनात पुढील मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. 1)भिमाकोरेगाव हल्यातील प्रमुख सुत्रधार मनोहर भिडे यांना त्वरित अटक करा 2)शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा 3) OBC,VJNT,SBC, विद्यार्थ्यांना 100%शिष्यवृत्ती द्या 4) SC,ST विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ वाटप करा 5)सिधापत्रीका मिळण्याचे अर्ज तहसिल कार्यालया मार्फत वाटप करा 6) सिधापत्रीका तात्काळ वाटप करा 7) रमाई आवास योजना(शहरी)भागामध्ये प्रभावीपणे राबवण्यात यावी 08)मौजे दानापुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरिल अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे 09) मौजे देहेड येथिल स्मशान भुमीची जागा बौध्द समाजाच्या नावे करण्यात यावी यासह आदी मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ भोकरदन तालुक्याच्या वतिने घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी भारिप ता. अध्यक्ष प्रदीप जोगदंडे,विशाल मिसाल, रमन पगारे, यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें