आकोट येथील अधिकारी युवतीची लग्न संबधात फसवणूक – प्रेम संबंध लपवून केला साखरपुडा.
ज़फर खान.
प्रतीनिधी,आकोट.
आकोट जि.आकोला येथील लग्ना आधीचे आपले प्रेम संबंध लपवुन एका 28 वर्षीय सुशिक्षित अधीकारी युवतीशी साखरपुडा करुन लग्न संबंधात फसवणूक करणाऱ्या मुला विरुद्ध आकोट शहर पो.स्टे.ला तक्रार दाखल करण्यात आली आहे.मुलीच्या तक्रारी वरुन आरोपी मुला विरुद्ध कलम ४१७,४२०,५०६ भादवी नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सदर मुला मुलीची ओळख ही विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर झाली होती.या संकेत स्थळावरील ओळखीतुन दोघांनी एकमेकांना पसंती दिली.त्यामुळं त्यांचे साक्षगंध देखील पार पाडण्यात आले होते.माञ साखरपुडा झाल्यावर लग्नाआधीच सदर मुलाचे दुसऱ्या मुली सोबत असणारे प्रेमसंबंध आपल्या पासुन लपवुन ठेवुन फसवणुक केल्याची बाब उच्च शिक्षित तरुणीच्या लक्षात येताच तीने आकोट शहर पो.स्टे.ला मुला विरुद्ध दि.२ एप्रिल रोजी तक्रार नोंदवली.फिर्यादी युवती ही आकोटात राहणारी असुन आरोपी मुलगा हा अहमदनगर जिल्ह्यातील आहे.या घटनेमुळं विवाह संकेतस्थळावरील दिली जाणारी माहीती जरी खरी असली तरी मुला मुलीच्या चारीञ पडताळणी बाबत पालकांनी सजग राहण्याची वेळ आली असल्याचे यावरुन दिसुन येते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें