प्रा. डॉ. अंभुरे यांच्या वतीने वाढदिवसा निमित्त ग्रंथदान.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०३एप्रिल २०१८येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात वाढदिवसानिमित्त ग्रंथभेट देण्याची परंपरा असून याचा भाग म्हणून इतिहास विभागाचे प्रा. डॉ. शिवाजी अंभुरे यांनी नुकतेच महाविद्यालयाच्या ग्रंथालयास स्वत:च्या वाढदिवसानिमित्त ग्रंथभेट दिली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत सातपुते होते. तर ग्रंथपाल प्रा. अनंत सरकाळे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थित होती.
वाढदिवसा निमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयाल ग्रंथ भेट दिल्याबद्दल सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्यावतीने प्रा.डॉ.अंभुरे यांचे अभिनंदन करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें