जालन्यात प्रतिष्ठितांच्या जुगार अड्‌ड्यावर धाड; 20 जण अटक. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 2 अप्रैल 2018

जालन्यात प्रतिष्ठितांच्या जुगार अड्‌ड्यावर धाड; 20 जण अटक.

जालन्यात प्रतिष्ठितांच्या जुगार अड्‌ड्यावर धाड; 20 जण अटक.

पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी स्वतः टाकली धाड.

एसआरपीचे तीन जवान, एक टीसी, सरपंच व व्यापाऱ्यांचा समावेश.

शे.अजहर बदनापुरकर.
जालना (प्रतिनिधी) - जिल्हा पोलीस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नेता नूरखान यांच्या भोकरदन नाका परिसरातील वातानुकुलीत जुगार अड्डयावर धाड टाकून 20 प्रतिष्ठित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून रोख एक लाख 20 हजार रूपयांसह आठ मोटर सायकली 20 मोबाईल, विदेशी दारू, फर्नीचर असा एकूण साडेसहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

या धाडशी कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

भोकरदन नाका परिसरातील सकलेचानगर भागात राष्ट्रवादी कांँग्रेसचे नेते नूरखान पठाण यंाची नूरखान प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल नावाची शाळा आहे. या शाळेमध्येच गेल्या काही दिवसापासून जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार आज सोमवारी (दि.3) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी मोठ्या फौजफाट्यासह या जुगार अड्डयावर धाड टाकली. यावेळी या शाळेच्या नावाआड चालणाऱ्या जुगार अड्डयावर अनधिकृत विद्युत चोरी करून सहा एसी. बसवून  पत्त्याचे दोन क्लब सुरू होते. या कारवाईमध्ये पोलिस अधिक्षक पोकळे यंाच्यासह उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन बारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राजेंद्रसिंह गौर, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महादेव राऊत, पोलिस उपनिरिक्षक हनुमंत वारे यांच्यासह सुमारे 50 पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी जुगार खेळतांना मुख्यसुत्रधार नुरखान पठाण यांच्यासह 19 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. यामध्ये शेख मंहमद शेख बुढन (रा.मस्तगड), शेख कदीर शेख रहिमोद्दीन (रा.नरिमान नगर), शाहु कचरू धोत्रेे (रा.माळीपुरा), नरेश पुरूषोत्तम अग्रवाल (रा.रेल्वे स्टेशन रोड), संजय दत्तुलाल अग्रवाल (रा.शिवाजी पुतळा), शेख अल्लाहुद्दीन शेख कासीम (रा.रामनगर), सुरेश चंदुलाल कक्कड (रा.मस्तगड), शेख युनुस शेख इस्माईल (रा.रेल्वे स्टेशन), जगन्नाथ मधवराव नागरे (रा.संभाजीनगर), शेख शब्बीर शेख इब्राहीम (रा.निवांत हॉटेल जवळ), रावसाहेब देवराव इंगोले (सरपंच, रा.धारकल्याण), कैलास सदाशिव गायकवाड (रा.ढोरपुरा), संदीप एकनाथ सराफ (रा.कावडपुरा गल्ली), कुणाल शिवाजीराव शिंदे (रा.मस्तगड), सचिन रूपचंद सांबरे (रा.शिवाजीनगर),संजय गिरमाजी कापुरे (रा.नवजिवननगर), गजानन दिनकर मोरे (एसआरपीएफ जवान), भिमराव अर्जुनराव गायके (एसआरपीएफ जवान) आणि बालाजी बंडुजी कांबळे (एसआरपीएफ जवान, रा.व्यकंटेशनगर) यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख एक लाख वीस हजार रूपये जप्त केले आहे तसेच आठ दुचाकी वाहने तीन लाख वीस हजार रूपयाचे , एक लाख रूपयाचे फर्निचर, वीस मोबाईल एक लाख रूपयाचे असा साडे सहालाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सर्व आरोपींना अटक करून त्यांना सदर बाजार पोलिस ठाण्यात एका वाहनातून नेण्यात आले. रात्रि उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती. या कारवाईमध्ये पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यंाच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सचिन बारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राजेंद्रसिंह गौर, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक महादेव राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक हनुमंत वारे , पोहेकॉ. कमलाकर अंभोरे, संतोष सावंत, शेख रज्जाक, विनोद गडदे, गोकुलसिंग कायटे, सचिन चौधरी, सॅंम्युअल कांबळे, सदा राठोड, समाधान तेलंग्रे यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें