येलदरी धरणातील गाळ काढण्याचा मुहूर्त आला!! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 4 अप्रैल 2018

येलदरी धरणातील गाळ काढण्याचा मुहूर्त आला!!

येलदरी धरणातील गाळ काढण्याचा मुहूर्त आला!!


 अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आ.भांबळेच्या हस्ते थाटात उद्घाटन!


जिंतूर दि.4 :- पुर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ झाला असून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार यायोजनेअंतर्गत
महाराष्ट्र शासन, मॅरिकोइनोव्हेशन फाऊंडेशन आणि अंबाजोगाईच्या मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गाळ काढण्याचा उदघाटन समारंभास आमदार विजय भांबळे,जिल्हाधिकारी
पी.शिवशंकर, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सब्बीनवार, मानवलोकचे
कार्यवाह अनिकेत लोहिया, कार्यकारी अभियंता अनमोड, नगरसेवक कपीलभाई
फारुखी यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी विधीवत पुजन करुन उदघाटन झाले.
प्रास्ताविकात मानवलोकच्या कार्याची माहिती कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी
दिली. येलदरी धरणातील 5 लाख धनमीटर गाळ काढण्याचे उद्दीष्ट पहिल्या
टप्प्यात ठेवण्यात आल्याचे सांगून त्यापुढेही 5 लाख घनमीटर गाळ उपसण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अधिक्षक अभियंता सब्बीनवार यांनी धरणातील
गाळाचे महत्व व त्यामुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे सांगितले.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी उपक्रमाचे कौतूक करुन यासाठी शासनपातळीवर सर्व सहकार्य करण्याचे अश्वासन दिले व मानवलोकने जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या धरणातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. आमदार भांबळे यांनीही यावेळी उपक्रमाचे कौतूक करुन घरणातील गाळ घेऊन जाऊन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा करुन घ्यावा असे आवाहन करीत त्यांनी गाळमुक्त धरणामुळे पाण्याचा संचय वाढण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.
       या कार्यक्रमास परिसरातील पदाधिकारी तसेच तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्यासह
विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी किणीचे सरपंच संतोष दौंड व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें