भारिप बहुजन महासंघाचे घंटानाद अंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 3 अप्रैल 2018

भारिप बहुजन महासंघाचे घंटानाद अंदोलन.

भारिप बहुजन महासंघाचे घंटानाद अंदोलन.


सेलु(प्रतिनिधि) :राज्य शासनाला झोपेतुन जागे करण्यासाठी व नागरीकांच्या विविध मागण्यासंदर्भात भारीप बहुजन महासंघाच्या वतिने घंटानाद अंदोलन करण्यात आले. मंगळवार 3 रोजी दुपारी 12 ते 3 यावेळेत तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्याची पुर्तता होत नसल्याने शासनाला झोपेतुन जागे करण्यासाठी घंटानाद करण्यात आले. भारिपच्या वतिने तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे भीमा कोरेगाव हल्ल्याचा मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना त्वरीत अटक करावी, बहुजन बांधवावरील खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थांना 100 टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, अ. जा. ,अ. ज. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देण्यात यावी, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, शेतक-यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, अँट्रासिटी संदर्भात पुर्नविचार याचिका तात्काळ सुनवणीस घेवुन सर्वाेच्च न्यायालयाचा मारक निर्णय रद्द करुन अनुसुचित जाती जमातीचे घटनात्मक संरक्षण कायम ठेवण्यात यावे, गायरान जमिनी कास्तकाराच्या नावे करण्यात याव्यात, भुमिहिन व्यक्तींना शासनाकडुन प्रतीमाह वेतन देण्यात यावे, रमाई घरकुल योजनेत मंजुर लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात यावी अशा मागण्या भारिप बहुजन महासंघाच्या वतिने तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. देंवेंद्र फडणविस यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. यासाठी भारिप बहुजन महासंघाचे ता. अध्यक्ष बुवाजी निकाळजे, शेख इस्माईल, सिद्धार्थ गायकवाड, विजय वाहुळे, तातेराव वाटुडे, विलास कांबळे, भगवान खंदारे, एकनाथ कांगले, बाबासाहेब लोंढे, केशव जोगदंड, राजेश दुधवडे, अशोक भारशंकर, विलास भारशंकर, अशोक भालेराव, नामदेव ठोके, अरविंद निकाळजे, सिद्धार्थ अवचार, किशन कांगले, नागोराव मस्के, लक्ष्मण प्रधान, गौतम वाघमारे आदींनी पुढाकार घेतला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें