सेलू परीसराचा ' पर्यटन हब 'च्या धर्तीवर विकास करा. (मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटने मुख्यमंत्र्यांना साकडे) - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 27 अप्रैल 2018

सेलू परीसराचा ' पर्यटन हब 'च्या धर्तीवर विकास करा. (मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटने मुख्यमंत्र्यांना साकडे)

सेलू परीसराचा ' पर्यटन हब 'च्या धर्तीवर विकास करा. 

(मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटने मुख्यमंत्र्यांना साकडे) 

समशेर खान.
(सेलू) महाराष्ट्र शासनाने तिर्थक्षेञाचा दर्जा दिलेल्या सेलू शहराच्या परीसरात एकुण  32 लहाण -मोठी प्राचीन व ऐतिहासिक तिर्थक्षेञे आहेत त्यामुळे त्यामुळे या परीसराचा 'पर्यटन हब ' म्हणुन विकास करावा अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
        निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी चे साईबाबा यांचे सदगुरू श्री संत केशवराज बाबासाहेब महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या सेलू शहराच्या 50 के 60 कि. मी. परीसरात  अत्यंत प्राचीन, ऐतिहासिक व सुंदरअशी एकुण 32 तीर्थस्थाने आहेत. परंतु या सर्वच ठीकानांना जोडणारे रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत असुन या ठीकाणी स्वच्छतेच्या मुलभुत सुविधांची वानवा आहे शिवाय या परिसरात बेसुमार वृक्षतोड झाल्यामुळे या सुंदर परीसराचे वाळवंट होते की काय ? अशी भिती निर्माण झाली आहे.
तेंव्हा प्राचीन संस्कृतीचा अमुल्य ठेवा असलेल्या या परिसराला महाराष्ट्र सरकारने वेळीच लक्ष देवुन पर्यटन हब चा दर्जा देवुन विकास करावा, या सर्व ठीकाणांना जोडणारे सर्व रस्ते तात्काळ दुरूस्त करावेत, तेथे स्वच्छतेच्या मुलभुत सोयी उपलब्ध कराव्यात, या परीसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करावे, नांदेड -अमृतसर सचखंड एक्सप्रेस, नगरसोल - नरसापुर ,ओखा रामेश्वरम या सारख्या सर्व एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना सेलू स्थानकावर थांबा देण्यात यावा, परतुर - सेलू - कोल्हा (परभणी) या महामार्गांना जोडणारया रस्त्याचे चौपदरीकरण करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. परभणी जिल्ह्याचा महसुलउपविभाग असलेले सेलू शहर मोठी व्यापारी पेठ, औद्योगिक केंद्र, शैक्षणिक, सामाजीक, सांस्कृतिक व राजकीय चळवळीचे केंद्र असुनही विकासाच्या बाबतीत उपेक्षितच आहे. त्यामुळे पर्यटन हब च्या धर्तीवर विकास केल्यास या परिसरात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी, विलाल पांडे, मनिष कदम, मोहन खापरखुंटीकर, आनंद बाहेती, अभिजीत राजुरकर, अजीत मंडलीक, शेख मुनिर, प्रसाद शिकारे, द्वारकादास गादेवार, अँड. लहेरचंद खोणा, डॉ.प्रवीण जोग, कैलास कदम, रामवल्लभ राठी आदींच्या स्वाक्षरया आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें