जिल्ह्याचा देश तसेच राज्य पातळीवर नावलौकिक होण्यासाठी जालना महोत्सवाचे सुक्ष्म नियोजन करा=पालकमंत्री बबनराव लोणीकर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 27 अप्रैल 2018

जिल्ह्याचा देश तसेच राज्य पातळीवर नावलौकिक होण्यासाठी जालना महोत्सवाचे सुक्ष्म नियोजन करा=पालकमंत्री बबनराव लोणीकर.

जिल्ह्याचा देश तसेच राज्य पातळीवर नावलौकिक होण्यासाठी  जालना महोत्सवाचे सुक्ष्म नियोजन करा=पालकमंत्री बबनराव लोणीकर.

 *रसायन तंत्रज्ञान* *महाविद्यालयाच्या उभारणीसाठी* *400 कोटी निधी मंजूर*

जालना, दि. 27 – जालना शहरात आयोजित करण्यात येणारा जालना महोत्सव यशस्वी होऊन जालना जिल्ह्याचे नाव देश तसेच राज्य पातळीवर पोहोचण्यासाठी जालना महोत्सव आयोजनाचे सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
  जालना शहरात 18 ते 22 एप्रिल, 2018 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या जालना महोत्सव 2018 च्या पूर्वतयारीची आढावा बैठक राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर पशुसंवर्धन,दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, प्रभारी जिल्हाधिकारी पी.बी. खपले, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अपर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, घनश्याम गोयल, सुभाष देविदान उमेश पंचारिया, गोविंदप्रसाद मुंदडा, सुदेश करवा, विरेंद्र धोका आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, मागील अनेक वर्षाच्या नंतर जालना शहरामध्ये अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावापासून मुक्तता मिळावी व जिल्ह्यातील कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा हा या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू आहे.  जालना महोत्सवामध्ये स्थानिक कलावंताना एक हक्काचे व्यासपीठ मिळणार असुन या माध्यमातुन त्यांना आपली कला सादर करता येणार आहे. त्याचबरोबर सर्व जाती-धर्माच्या गुरुंना या कार्यक्रमात सहभागी करुन घेत एक आपलेपणानाची भावना या कार्यक्रमातून समाजामध्ये दृढ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत हा महोत्सव यशस्वी होऊन जालना जिल्ह्याचं नाव देशपातळीवर जावा यासाठी पदाधिकारी, अधिकारी तसेच जिल्ह्यातील प्रत्येक समाजाच्या व्यक्तीने या महोत्सवात सहभाग नोंदविण्याचे आवाहन करत या कार्यक्रमादरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राखवण्यासाठी  जिल्हा पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिले.
जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यात येत असुन मराठवाड्यासह राज्यातील विद्यार्थ्यांना रसायन तंत्रज्ञानाबाबत शिक्षण घेता यावे यासाठी जिल्ह्यातील सिरसवाडी येथील गट नं. 132 मधील 200 एकरवर शासनाच्या अधिपत्याखाली अभिमत विद्यापीठाचा दर्जा असणाऱ्या रसायन तंत्रज्ञान महाविद्यालय उभारण्यासही मंत्रीमंडळाने मान्यता देऊन यासाठी 400 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे.  त्याचबरोबर मराठवाड्यासह जिल्ह्यातील जवळपास 40 हजार लोकांना रोजगार देऊ शकणाऱ्या आणि सुमारे 6 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करण्याची क्षमता असलेल्या 109 कोटी रुपये गुंतवणुकीचा सीडपार्क जालना परिसरात करण्यास अलिकडेच मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.  या सीडपार्कमुळे बियाणे उद्योगासमोरील अडचणी दूर करण्याबरोबरच पायाभुत सुविधांचा विकास करुन बियाणे उत्पादन क्षेत्रात पोषक वातावरण निर्मितीद्वारे रोजगार आणि गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
*पालकमंत्री श्री लोणीकरांच्या पाठपुराव्यामुळे*
*रसायन तंत्रज्ञान महाविद्यालासाठी 400* *कोटींचा निधी मंजूर- राज्यमंत्री* *श्री खोतकर*
  राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, मानवी मनाला ताकद देणाऱ्या तसेच उत्साह निर्माण करणाऱ्या अशा  जालना महोत्सव 2018 या कार्यक्रमाचे 18 ते 22 एप्रिल दरम्यान जालना शहरात आयोजन करण्यात आले आहे.  जगाच्यापाठीवरील कलाकृतींची या महोत्सवाच्या माध्यमातुन जिल्हावासियांना ओळख होणार असुन स्थानिक कलावंतांनादेखील त्यांच्या कला सादर करण्याची संधी या माध्यमातुन मिळणार आहे.  या महोत्सवाचा लाभ जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नागरिकांनाही घेता यावा यासाठी या महोत्सवाच्या प्रचार, प्रसारावर भर देण्यासाठी समाजमाध्यमांचा अधिकाधिक उपयोग करण्याची सुचना करत जालना जिल्ह्याचा पालकमंत्री श्री लोणीकरयांच्या पुढाकारातून अधिक वेगाने विकास करण्यात येत आहे.  विद्यार्थ्यांना रसायन तंत्रज्ञानाबाबत शिक्षण घेता यावे यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केल्यामुळे  अभिमत विद्यापीठाचा दर्जा असणाऱ्या रसायन तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या  उभारण्यास शासनाने मान्यता देऊन यासाठी 400 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला असल्याचेही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.
बैठकीचे संचलन विरेंद्र धोका यांनी केले तर आभार अपर आयुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी मानले. बैठकीस पदाधिकारी अधिकारी यांच्यासह जालना महोत्सव 2018 संयोजन समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांचर मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें