वृक्ष लागवड पुर्वतयारीचा भर उन्हात घेतला आढावा. सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी चार दिवसात दिल्या ३९ आश्रमशाळांना ,१३ शासकीय वसतिगृहांना दिल्या भेटी भेटी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 27 अप्रैल 2018

वृक्ष लागवड पुर्वतयारीचा भर उन्हात घेतला आढावा. सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी चार दिवसात दिल्या ३९ आश्रमशाळांना ,१३ शासकीय वसतिगृहांना दिल्या भेटी भेटी.

वृक्ष लागवड पुर्वतयारीचा भर उन्हात घेतला आढावा.  सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी चार दिवसात दिल्या ३९ आश्रमशाळांना ,१३ शासकीय वसतिगृहांना दिल्या भेटी भेटी.


समाजकल्याण विभागामार्फत आठ हजार वृक्षलागवडी चे नियोजन पुर्ण .

समशेर खान.
सेलू (प्रतिनीधी)
                   महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण ,संतुलीत व समृध्दी योजनेअंतर्गत महावृक्ष लागवड मोहीमेत जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांच्या सुचनेप्रमाणे  समाजकल्याण विभागामार्फत आश्रमशाळा, शासकीय निवासी शाळा व वसतिगृह येथे आठ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले असुन सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी या पुर्वतयारी बाबतचा आढावा चार दिवसात ३९ आश्रमशाळा ,४शासकीय निवासी शाळा,९ वसतिगृह यांना भर उन्हात  भेटी देऊन घेतला आहे.
                     महावृक्ष लागवड मोहीमेच्या पुर्वतयारीचा आढावा म्हणुन खोदलेले खड्डे पाहण्यासाठी सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी सेलू तालुक्यातील वालूर येथे शांताबाई नखाते आश्रमशाळेस २६ एप्रील रोजी दुपारी २वा भेट देऊन खोदलेल्या खड्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले  त्यांच्या सोबत अधिक्षक बि.एन. स्वामी ,समाकल्याण निरीक्षक टि डी  भराड हे होते  यावेळी चर्चेदरम्यान सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी सांगीतले की ,शासनाची महावृक्ष लागवड मोहिम पुर्णपणे यशस्वी करण्यासाठी परभणी जिल्ह्याचे उदीष्टपुर्तीसाठी जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.या मोहिमेचाच एक भाग म्हणून समाजकल्याण विभागातंर्गत ३९ आश्रमशाळा ,४ निवासीशाळा,९  वसतीगृह यांना प्रत्येकी १५० रोपाची लागवड करून संवर्धन करण्याबाबत नियोजन केले आहे .या मोहीमेची पुर्वतयारी म्हणून खोदलेल्या खड्याची पाहणी दौरा केला असून वृक्ष लागवड सप्ताह मध्ये समाजकल्यान विभागामार्फत  वृक्षाची रोपे लावून त्याचे संवर्धन केले जाणार आहे असे माळवदकर यांनी सांगीतले.
 दुष्काळी परीस्थीती व पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्याच्या हेतुने राबविण्यात येणार्या महावृक्ष लागवड मोहिमेत मुख्याध्यापक, गृहपाल यांनी सामाजिक बांधीलकी म्हणुन वृक्षारोपण आणि संवर्धन करावे असे अवाहन ही सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले.
अक्षांश-रेखांश वर कळणार रोपाची स्थीती.      ३९आश्रमशाळा ,९ शासकिय वसतीगृह व ४ निवासी शाळा या सर्वांची अक्षांश- रेखांश माहिती संकलीत केली असुन खोदलेल्या खड्याचे अक्षांश -रेखांश प्रमाणे छायाचित्रे जिल्हाधिकारी कार्यालय व वनविभाग यांना सादर केली जाणार आहेत . कोणतं रोप कोणत्या ठिकाणी व कोणत्या जातीच आहे याची माहिती मँप वरून पाहता येणार आहे .त्यामुळे समाजकल्यान विभागाची     वृक्षलागवड मोहीम यशस्वी होईल आसा विश्वास सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी व्यक्त केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें