प्रेरकांनवर ऊपासमारीची वेळ.जिल्हा अध्यक्ष : गौतम साळवे
शासन दरबारी वारंवार निवेदन देऊनही शासनाचे ऊदासिन व वेळकाढु धोरण..
शेख सलीम
प्रतिनिधी : भोकरदन
आज १० एप्रिल रोजी प्रेरक संघटना जालना च्या वतिने विविध मागण्यासाठी मा.अप्पर जिल्हाधिकारी जालना यांची भेट घेतली व प्रेरकांच्या विविध मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली.
शासनाच्या ऊदासिन धोरणामुळे साक्षर भारत यौजनेत काम करनार्या कर्मचार्यानवर ऊपासमारीची वेळ आलि आहे.वारंवार निवेदन देऊनही प्रेरकांचे थकीत एकुन ४७ महिण्याचे शासनाणे अदा केलेले नाही .
जालना जिल्हा मध्ये साक्षर भारत यौजना केंद्र सरकारच्या सुचनेनुसार शेक्षणिक वर्ष २०११-२०१२ पासुन सुरु करण्यात आलि.आणी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर लोकशिक्षण केंद्र स्थापन करुन त्या केंद्रावर मुख्याध्यापक यांच्या नियंञना खालि प्रेरकांची निवड गुणवत्तेच्या आधारे करण्यात आली,त्यानुसार जालना जिल्हा मध्ये एकुण १५६२ प्रेरकांची निवड करण्यात आली.सदरील प्रेरकांनी ईमाने ईतबारे काम करुन चागल्या प्रकारे केद्रांचे संचलन करुन आजपर्यत एकुन मुलभुत साक्षरता परीक्षेच्या माध्यमातुन जवळपास १८३२५४ निरंक्षराना साक्षर करण्याचे काम केले आहे.
आणी हे अध्ययनाचे कार्य करत आसतांना त्यांना माञ २०००रु एवढे मानधण दिले जाते ते मानधण हि २०१२ पासुन जवळपास ४७ महिण्याचे थकित आहे.तरी आपण आमच्या निवेदनावर सहाणुभुतीपुर्वक विचार करुन प्रेरकांचे थकित मानधण लवकरात लवकर अदा करावे.
सदरील निवेदनावर प्रेरक संघटना जिल्हा अध्यक्ष गौतम साळवे,ऊपाध्यक्ष विकी पाखरे,अविनाश जाधव,मगर मँडम,जामकर मँडम,अविनाश दाभाडे,नवनाथ पवार,कैलास म्हस्के,राजेश दोडवे,दिपक ब्राम्हणे,मिर्झा कुंभारी,व ईतर प्रेरक प्रेरीकांच्या मोठ्या प्रमानात स्वाक्षर्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें