भोकरदन जि प कन्या शाळेत म.फुले जयंती उत्साहात साजरी.
शे.सलिम.प्रतिनिधी.भोकरदन.
जिल्हापरिषद केंद्रीय कन्या शाळेत महात्मा फुले जयंती केंद्रीय मुख्याद्यापक व्ही.एन.घायाळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात संपन्न झाली.
प्रमुख पाहुणे म्हणून एस.शास्त्री,सी.बी.कदम,श्रीम. एस.बी.गव्हाणे, श्रीम.सी.आर.इंगळे, श्रीम.एस.एम.मुरकुंदे,किरण साळवे आदी उपस्थित होते.
नियोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम सौरभ नारायण ढोके तर द्वितीय कु.वैष्णवी ज्ञानेश्वर वाघ हीने पटकाविला यशस्वी विद्यार्थ्यानां बक्षीसे वाटप केली.
शेवटी प्रत्येक मुलामुलीनां खाऊचे वाटप करून समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सी.बी.कदम यांनी केले तर आभार एस.एस.शास्त्री यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें