“महामानवाला अभिवादन”लोकराज्यच्या विशेषांकातुन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल.
- पालकमंत्री बबनराव लोणीकरजालना, दि. – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव भारताच्या इतिहासातील महत्वपूर्ण असे नाव आहे. विसाव्या शतकाच्या कालखंडातील त्यांनी केलेले कार्यकर्तृत्व भारताच्या इतिहासातील क्रांतीकारक ठरले असुन त्यांचे जीवनकार्याची माहिती देणाऱ्या माहिती व जनसंपर्क विभागाने प्रकाशित केलेल्या “महामानवाला अभिवादन” या लोकराज्याच्या विशेषांकाच्या माध्यमातून त्यांचे जीवनकार्ये सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल असा विश्वास राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या एप्रिल महिन्याच्या महामानवाला अभिवादन या लोकराज्यच्या विशेषांकाचे प्रकाशन आज दि. 9 एप्रिल 2018 रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नीमा अरोरा, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धोत्रे, जिल्हा अधीक्षक क्रुषि अधिकारी दशरथ तांबाले, निवासी उप जिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा महिती अधिकारी एस.के. बावस्कर आदींची उपस्थिती होती.
यावेळी राज्यमंत्री श्री खोतकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला महामानवाला अभिवादन हा लोकराज्यचा अंक अत्यंत चांगला व संग्रही ठेवण्यासारखा अंक असुन अशा प्रकारचे अंक सातत्याने प्रकाशित व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें