जिल्ह्यातील विविध योजनांच्या कामांचा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतला आढावा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 9 अप्रैल 2018

जिल्ह्यातील विविध योजनांच्या कामांचा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतला आढावा.

जिल्ह्यातील विविध योजनांच्या कामांचा

पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतला आढावा.

  जालना, दि. 9 – जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या कामाचा आढावा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
आयोजित बैठकीत विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी  शिवाजी जोंधळे, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नीमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धोत्रे, जिल्हा अधीक्षक क्रुषि अधिकारी दशरथ तांबाले,  निवासी उप जिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संदीप पाटील, कार्यकारी अभियंता अजय सिंह, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता कैलास हुमने,  जिल्हा महिती अधिकारी एस.के. बावस्कर यांच्यासह सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार व सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय रुरबन मिशनच्या कामाला गती द्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय रुरबन हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून देशात या माध्यमातून १०० तर राज्यात ६ क्लस्टर करण्यात येत असून यामध्ये परतूर तालुक्यातील आष्टीसह १६ गावांच्या विकासासाठी राष्ट्रीय रुरबन योजनेतून १८५ कोटी रुपयांच्या  माध्यमातून गावांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. राष्ट्रीय रुरबन मिशन संदर्भात सातत्याने बैठका व कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.  परंतू या कामामध्ये पाहिजे त्या प्रमाणात गती येत नसल्याने अधिकाऱ्यांनी या कामाला गती देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री लोणीकर यांनी दिले.
शेतीपिकातून विविध उत्पादने तयार करुन त्यावर प्रक्रिया करणारे छोटेछोटे उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. टोमॅटो, केळी, बटाटे, सोयाबीन या पिकांचे या भागात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते या पिकापासून तयार केलेल्या मालाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असून गावातील शेतकऱ्यांचे बचतगट तसेच महिलांच्या बचतगटांना एकत्रित करुन परतूर तालुक्यात 100 प्रकल्प उभारण्याचा मानस असल्याचे व्यक्त करून यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातातील मालावर शेतकरीच प्रक्रिया करणार असून त्यामुळे त्यांच्या शेतमालाला भाव व बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे सांगत पालकमंत्री श्री लोणीकर यांनी नळाद्वारे पाणीपुरवठा घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन गाव अंतर्गत गटारे, रस्त्यावरील दिवे, गाव अंतर्गत रस्ते जोडणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, एल पी जी गॅस कनेक्शन, कौशल्य विकास प्रशिक्षण, कृषी प्रक्रिया, स्टोरेज आणि गोदाम व्यवस्था शाळा सुधारणा, उच्च शिक्षण सुविधा, आरोग्याच्या सुविधा, दुग्धविकास,  सामाजिक न्याय, मत्स्य व्यवसाय विकास, वनीकरण, प्रधान मंत्री आवास योजना आदींचाही उपस्थित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.
मुख्यमंत्री कृषी सौर योजनेंतर्गत जिल्ह्यात सौरऊर्जेचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार असुन या योजनेसाठी जिल्ह्यातील 33 के.व्ही. उपकेंद्रालगत असलेल्या शासकीय जमीनीची पहाणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी शासकीय जमीन नाही अशा ठिकाणी खासगी जमीनी भाडे तत्वावर घेता येणार असल्याने या कामासही अधिकाऱ्यांनी गती देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिले.
पाणीटंचाई आढावा
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातुन जलसंधारणाची अनेक कामे यशस्वीरित्या झाली आहेत.  अनेक भागातील पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे.  गतवर्षात 450 टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता परंतू आजघडीला केवळ 44 टँकरद्वारे जिल्ह्यात पाणी पुरवठा करण्यात येत असुन नागरिकांनी मागणी केल्यास तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
जिल्ह्यात 35 गावे व 2 वाड्यांना 18 शासकीय तर 26 खाजगी अशा एकूण 44 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असुन 97 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी यावेळी दिली. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें