शेतकऱ्यांना दर्जाहिन बियाणांची विक्री करणाऱ्या दुकानदारांसह उत्पादकांवर कडक कारवाई करा - पालकमंत्री बबनराव लोणीकर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 9 अप्रैल 2018

शेतकऱ्यांना दर्जाहिन बियाणांची विक्री करणाऱ्या दुकानदारांसह उत्पादकांवर कडक कारवाई करा - पालकमंत्री बबनराव लोणीकर

शेतकऱ्यांना दर्जाहिन बियाणांची विक्री करणाऱ्या दुकानदारांसह उत्पादकांवर कडक कारवाई करा   - पालकमंत्री बबनराव लोणीकर

खरीप हंगाम 2018 च्या पूर्वतयारी आढावा संपन्न.

जालना, दि. 9 –शेतकऱ्यांना पेरणीसाठी देण्यात येणाऱ्या बि-बियाणांच्या वाणाचा दर्जा उत्तम राखण्यात यावा.  शेतकऱ्यांना दर्जाहिन बियाण्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांसह उत्पादकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगाम 2018 च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाबाबत गतवर्षात बँकांनी चांगले काम केले असल्याचे सांगत पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये जालना जिल्हा देशात प्रथम आला. शेतकऱ्यांना कर्ज वाटप करत असताना दलालांचा यामध्ये मोठा हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.  प्रत्येक पात्र व गरजू शेतकऱ्याला पीककर्ज मिळावे व दलालांचा कुठलाही हस्तक्षेप यामध्ये होऊ नये यासाठी बँकांनी प्रत्येक शाखेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. महसुल तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी बँकामध्ये प्रत्यक्ष जाऊन दलालांचा हस्तक्षेप होत नाही ना याबाबत तपासणी करण्याचे निर्देश देत प्रत्येक बँकेला पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात येते.  बँकांनी उद्दिष्टानुसार शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करावे. या कामात हयगय अथवा टाळाटाळ करणाऱ्या बँकेविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशाराही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिला.


शेतकऱ्यांना कृषि यांत्रीकीकरण योजनेच्या माध्यमातून शासनामार्फत औजारे वाटप करण्यात येतात.  शेतकऱ्यांना औजारे खरेदीसाठीचे अनुदान आता थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार औजारे खरेदी करता येत सांगत शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळावीत, खत वाटपामध्ये पारदर्शकता यावी यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर ई-पॉस मशिन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  शेतकऱ्यांना दर्जेदार व रास्त भावामध्ये बि-बियाणे व खते मिळावीत यासाठी तसेच त्यांची फसवणुक होऊ नये यासाठी ग्रामस्तरावर ई-पॉस मशिनबाबत जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
शेतकऱ्यांप्रती शासन सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन अनेकविध निर्णय घेत असुन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र व गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला असल्याचे सांगत 12 मार्च, 2018 पर्यंत जिल्ह्यातील एकूण 1 लाख 57 हजार 886 शेतकऱ्यांना 956 कोटी 45 लक्ष 59 हजार इतक्या रक्कमेची कर्जमाफी करण्यात आली असुन जिल्ह्यातील 20 बँकेच्या एकूण 162 शाखामार्फत 1 लाख 23 हजार 851 शेतकऱ्यांना 593 कोटी 80 लक्ष 61 हजार इतक्या रक्कमेचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या पीकांच्या नुकसानीचे भरपाई म्हणून शासनाने हेक्टरी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय केला असुन भविष्यात अशा प्रकारचा प्रादुर्भाव पिकांवर होऊ नये यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपायोजनांची गावपातळीवर जनजागृती करण्याचे निर्देश देत नॉन प्लॅनमधील कामांसाठी  निधी खर्च करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला असुन पालकमंत्री पांदण रस्त्यासाठी एक किलोमीटर कामासाठी 50 हजार रुपयांपर्यंतचा निधी आता खर्च करता येणार असल्याचे या कामासही प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिले.
  यावेळी राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, शेतकऱ्यांवर सातत्याने अनेक संकटे येत आहेत. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे, पतपुरवठा तसेच मुबलक प्रमाणात वीज आदी बाबी कमी पडता कामा नये.  शासनाने जाहीर केलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम प्रशासकीय यंत्रणांवर असल्याने खरीप हंगामात सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांचे काम चोखपणे पार पाडण्याची सुचना करत जिल्ह्यात धान्य साठवणुक असलेले गोदाम हे जिल्ह्यात उत्पादित झालेला माल साठवणुकीसाठी आरक्षित करण्याबरोबरच गारपिटीमध्ये शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव शासनास पाठविण्याचे निर्देशही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी उपयुक्त अशा सुचना मांडल्या तर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाची माहिती दिली.
प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे  यांनी पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातुन माहिती दिली. या बैठकीस कृषी विभागातील अधिकारी, विविध बँकांचे प्रतिनिधी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या हस्ते तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वितरण
डिजिटल इंडिया लँड रेकॉर्डस मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत  ई फेरफार आज्ञावलीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील मंडळ अधिकारी व तलाठ्यांना पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लॅपटॉप व प्रिंटरचे वाटपही यावेळी करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें