डासाळा गावच्या विकासासाठी गजमल यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 15 अप्रैल 2018

डासाळा गावच्या विकासासाठी गजमल यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.

डासाळा गावच्या विकासासाठी गजमल यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.



सेलू (प्रतानीधी)
                सेलू तालुक्यातील डासाळा या गावात स्त्याच्या प्रश्‍नासह सिंचन, पिक विमा , ग्रामशौचालय  यासह पाण्याच्या पाण्याची गंभिर परीस्थीती असुन एकंदर डासाळा गावच्या विकासासाठी लक्ष घालावे कशी विनंती भगवान गजमल यांनी जिल्हाधीकारी यांची भेट घेऊन त्यांना केली आहे.
               डासाळा हे गांव सेलू तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचे गांव असून गावातील समस्या सोडवून विकास करण्याबाबत चे निवेदन येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान गजमल यांनी जिल्हाधिकारी शिव शंकर यांना १० एप्रिल रोजी निवेदन देऊन विनंती केली आहे .या निवेदनात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लेंडी नदीचे खोलीकरण होणे गरजेचे आहे याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.दोन वर्षांपासून जलयुक्त शिवार अंतर्गत डासाळा गावची निवड होऊन कोणतीही कामे झाली नाहीत .तसेच डासाळा येथे येणारा आष्टी हा  रस्ता  खराब झाला आहे. तर.आहेर बोरगाव ते डासाळा या रस्त्यासखठी निधी मंजुर होऊनही काम चालू नाही . दळण वळणाचा प्रश्न बिकट बनला आहे.तसेच विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे .विमा भरलेली रक्कम सुध्दा शेतकऱ्यांना परत मिळत नाही अशीस्थीती आहे .शासनाच्या महत्वपूर्ण अशा गांव हागणदारी मुक्त करण्यासाठी शौच्यालय योजनेचे काम ही समाधानकारक नाही .दुधना पात्रातुन घेण्यात आलेल्या आठ गांव पाणी पुरवठा योजना अपयशी ठरली आहे त्यामुळे महिलांना डोक्यावर हंडा भरून आणण्यासाठी आर्धा दिवस घालवावा लागत आहे.याबाबत जिल्हाधिकारी शिवशंकर यांनी लक्ष देऊन गावचा विकास करावा अशी मागणी शेतीनिष्ठ शेतकरी भगवान गजमल यांनी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें