सेलूत शिवसनेचा मंगळवारी मोर्चा.
पिक विमा कंपनीचा शेतकऱ्यांना ठेंगा जिल्ह्यात कार्यालय नाही हे दुर्दैव.
राम खराबे यांची पत्रकार परीषदेत माहिती
सेलू (प्रतिनीधी)
पिकविम्याने शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आणले तसेच गारपीट, बोंडआळी च्या अनुदानासह शेतकर्यांसाठी शिवसेनेच्या वतीने १७ एप्रील रोजी सेलू येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा चे आयोजन केले आहे अशी माहिती शिवसेनेचे जिंतुर सेलू विधानसभा अध्यक्ष राम खराबे यांनी दिली
शासकीय विश्रामगृह येथे १३ एप्रील रोजी शिवसेनेचे जि.प.गटनेते राम पाटील खराबे यांनी दिली पत्रकार परीषद घेऊन १७ एप्रील रोजी आयोजीत केलेल्या मोर्चा बाबत माहिती विशद केली .यावेळी भाजप चे सरकार असतांना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यावर शेतकर्यांच्या प्रश्नासाठी भांडण्याची वेळ यावी हि बाब दुर्दैवी म्हणावी लागेल भाजपाच्या कारभारावर राम पाटील खराबे यांनी सडेतोड टिका केली .ते म्हणाले की ,पिक विम्यात संबधीत कंपनीने शेतकर्यांची फसवणूक केली आहे .ज्या पटीत विमा मिळणे अपेक्षीत होते त्याप्रमाणे अनुदान मिळाले मिळत नाही.तर कोट्यवधी विमा रक्कम जमा करणार्या विमा कंपनीचे साधे जिल्ह्यात कार्यालय नाही याबाबत संताप व्यक्त केला. तसेच गारपिट बोंडअळी अनुदान हि रखडले आहे त्यामूळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. घरकुलाच्या कामासाठी वाळू मिळत नाही वाळूचे दर गगणाला भिडले आहेत तर दुसरीकडे तूर , हरभरा केंद्रावर काटे वाढविण्याची आवश्यकता आहे ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याची तोडलेली विज पुर्ववत सुरु करावी, मनरेगाच्या सिंचन विहीरीला मंजुरी द्यावी .आदि मागण्यांसाठी १७ एप्रील रोजी खा.संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार हरीभाऊ लहाने, जि.प.गटनेते राम खराबे यांच्या उपस्थीतीत उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परीषेद राम पाटील खराबे यानी दिली यावेळी तालूका प्रमुख रणजित गजमल ,शेषराव वाघमोडे अतूल डख ,रामेश्वर बहिरठ ,जिजाभाऊ सोळंके ,गौतम कणकुटे बाबासाहेब भाबट यांनी पत्रकार परीषेद करीता पुढाकार घेतला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें