अत्याचार पिडित मुलींच्या न्यायासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने कँडल मार्च. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 17 अप्रैल 2018

अत्याचार पिडित मुलींच्या न्यायासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने कँडल मार्च.

अत्याचार पिडित मुलींच्या न्यायासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने कँडल मार्च.


शेख कलीम
सिल्लोड प्रतिनिधी-कठुवा (जम्मु-काश्मीर) व उन्नाव (उत्तर प्रदेश)यासह देशात इतरत्र झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ अत्याचार पिडित मुलींच्या न्यायासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि 16 सोमवारी सायंकाळी 7 वाजता डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड ते प्रियदर्शनी चौक सिल्लोड पर्यंत माजी मंत्री तथा जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत कँडल मार्च काढण्यात आला.
कठुआ आणि उन्नाव येथील अत्याचाराविरोधात संपूर्ण देशभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. सिल्लोड शहरातही 'वि वॉन्ट जस्टिस'चे पोस्टर हाती घेत शेकडो नागरिकांनी
सोमवारी रात्री डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पासून कॅण्डल मार्च काढला.कैंडल मार्च हा अण्णाभाऊ साठे चौक,भगतसिंग चौक,महावीर चौक मार्गे प्रियदर्शनी चौक येथे आल्यानंतर प्रियदर्शनी चौकात कठुआ येथील अत्याचारात मृत्यू झालेल्या बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, उपाध्यक्ष शकुंतलाबाई बन्सोड, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, सोयगाव प.स.सभापती धरमसिंग चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक दामोदर गव्हाणे, यांच्यासह नगर सेवक विठ्ठल सपकाळ, सुनील दुधे, शंकरराव खांडवे, कैसर आझाद, ताई निकम,हाजी मोहम्मद इसहाक, रईस मुजावर, चांद बेग, शेख बाबर, राजू दुधे, शेख मोहसीन, राजू गौर, संजय मुरकुटे, राजेंद्र बन्सोड, संजय आरके, राजू बागवान, राजेश्वर आरके, जगनाथ कुदळ, फईम पठाण, कुणाल सहारे, मतीन देशमुख, मुश्ताक देशमुख, हनिफ मुलतानी, दत्ता शेजुळ, अक्षय मगर यांच्यासह मोठ्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते व नागरिकांची उपस्तिथी होती.
भाजपा सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे अत्याचारात वाढ........ भाजपा सरकारचे वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण नसल्याने व गुन्हेगारांना भाजपा पुढारी पाठीशी घालत असल्याने कठोर कायद्यांनादेखील आव्हान देत अत्यंत क्रुरपणे अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उन्नाव आणि कठुआ येथे घडला असून ही घटना म्हणजे मानुसकिला काळीमा फासनारी आहे.अशा घटना पुन्हा घडू नए यासाठी सरकारने कायद्याची कठोर अमलबजावनी करुण या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी तत्काळ पावले उचलून आरोपींना फाशीची शिक्षा देऊन अत्याचार पीडित मुलींच्या कुटुंबांना न्याय द्यावा.आ अब्दुल सत्तार माजी मंत्री जिल्हाध्यक्ष काँग्रेस.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें