#कायदा व #सुव्यवस्थेबाबत ना. #लोणीकर यांच्याकडून आढावा.
विशेष.प्रतिनिधि.समशेर खान.
परभणी, दि. १७- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते परभणी व जालना जिल्ह्यातील विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन,पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण व मागील तीन महिन्यापासून राबविण्यात आलेल्या समाधान शिबिराचा समारोप कार्यक्रम दिनांक १९/०४/२०१८ रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे आयोजित केला आहे.या पार्श्वभूमीवर परभणी दौऱ्यावर आलेले राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. बबनराव लोणीकर यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांकडून त्यांनी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने करावयाच्या उपायांबाबत त्यांनी सूचना केली. जिल्हा क्रीडा संकुल परीसरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आणि त्या अनुषंगाने बंदोबस्त ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी ना.लोणीकर यांनी उपस्थित प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांना कार्यक्रमाविषयी माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी, पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें