जागतिक पुस्तक दिन विशेष. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य व उपक्रम. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 23 अप्रैल 2018

जागतिक पुस्तक दिन विशेष. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य व उपक्रम.

जागतिक पुस्तक दिन विशेष.

जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य व उपक्रम.


अनवर पठाण दि.२३एप्रिल २०१८

२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन व जगप्रसिध्द साहित्यीक शेक्सपिअर यांचा जन्मदिन मृत्युदिन. कॉपीराईट दिन म्हणुनही आजचा दिवस जगभर साजरा केला जातो. युनेस्कोतर्फे दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो. सर्वप्रथम १९९५साली या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अक्षरांची जगाला जाणीव करून देणार्‍या या चळवळीला या वर्षी  23 वर्षे पूर्ण होत आहेत. वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईट विषयी कायद्याची जाण लोकांना व्हावी म्हणून या दिवसाचे आयोजन केले जाते. तसेच वाचन संस्कृती वाढावी आणि तिचा एक ग्लोबल अविष्कार साकारला जावा, म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहे. आज जवळपास १०० पेक्षा जास्त देशात हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.

  पूर्वी केवळ ‘वाचनालय’ हे पुस्तके वाचण्याचे आणि मिळण्याचे एकमेव ठिकाण होेते. लोक आवडीने वाचनालयास भेट द्यायचे. आज पुस्तके वाचण्याचे आणि खरेदी करण्याचे मोठो स्त्रोत निर्माण झाले आहे. तंत्रज्ञानामुळे चांगल्या पुस्तकांचा आणि लेखकांचा प्रसार मोठ्या  प्रमाणात होत आहे. फ्लिपकार्ड, होम शॉप-18, बुक गंगा, पेंगविंग बुक्स या आॅनलाईन संकेतस्थळांमुळे दर्जेदार पुस्तके चांगल्या किंमतीत घरपोच मिळतात; तर ‘किंडल ई-बुक’मुळे पुस्तके आॅनलाईन देखील वाचता येतात. असे असले तरी तरून पिढीला पुस्तके वाचण्याची फारशी ओढ उरली नासून वाचन संस्कृती हळू-हळू कमी होत असल्याचे विविध सर्व्हेक्षणातून निदर्षनात आले आहे.

‘‘पुस्त्कांचे वाचन करावे यासाठी कोणीच कोणावर दबाव टाकू शकत नाही. वाचनाची आवड ही स्वतःच निर्माण करायची असते. वाचनाचे महत्त्व आणि त्यामुळे आपल्या जीवनावर पडणारा प्रभाव, याबाबत विद्यार्थ्यांना  लहानपणापासूनच सांगितले पाहिजे, इंग्लंडमध्ये वाचनासाठी उत्कृष्ट सुविधा आहेत. प्रत्येक वयोगटातील वाचकांसाठी मोफत सुविधा पुरविल्या जातात. परंतु परदेशांच्या तुलनेत भारतातील वाचनालयांची स्थिती आणि विविध विषयांवरील पुस्तांकची असलेली उपलब्धता यामध्ये खूप विसंगती आहे. तर तंत्रज्ञान आणि ‘ई-बुक’ मुळे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची गोडी कमी होत असल्याचे सत्य कोणीही नाकारू शकत नाही, असे माझे मत आहे. वाचनाची गोडी लहानपणापासूनच असणे आवश्यक आहे.
भारतात पुस्तक दिन साजरा करण्यास फारसे महत्त्व प्राप्त झालेले नाही. इतर अनेक देशांमध्ये या दिवशी पुस्तके आणि गुलाबाचे फुल भेट देऊन हा दिवस साजरा केला जातो. पुस्तकांशी आणि लेखकांशी संबंधित माहिती असणारे पोस्टर्स तयार करून ते वाटले जातात. तरूणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवणे, स्थानिक प्रशासन, शाळा, महाविद्यालये आणि प्रकाशक यांच्या सहाय्याने लहान व मोठ्या शहरांमध्ये ‘बुक फेस्टिवल’चे आयोजन करून वाचन संस्कृतीला चालना देणे ही काळाची गरज बनली आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या वाढदिवसा निमित्त केक कापन्या पेक्षा पुस्तके भेट म्हणुन द्यावीत. यामुळे मुलांना पुस्तकांची ओळख होईल व हळूहळू मुलं पुस्तक वाचायला लागतील. वाचनाने जगाची ओळख होते हे विसरता कामानये. "वाचाल तर वाचाल" असे म्हणतात ते उगीच नाही.

लेखक.=अनवर पठान.
मु.पो.वालुर ता.सेलु.जि.परभणी.
मो.नं.8888375846
pathananwar96@gmail.com.
www.tezznews24.com

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें