अवैध वाळू ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार.वालुर येथील घटना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 23 अप्रैल 2018

अवैध वाळू ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार.वालुर येथील घटना.

अवैध वाळू ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार.वालुर येथील घटना.


◾सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपीची पोलिस  कोठळीत रवानगी.


सेलू: प्रतिनिधी
समशेर खान
 तालुक्यातील वालुर येथील रहिवासी  बाबासाहेब जिजाभाऊ धापसे (वय ४५वर्षे) यांचा २१ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता   एका अवेध वाळूच्या ट्रॅक्टरने  धडक दिल्याने झालेल्या  अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
बाबासाहेब जिजाभाऊ धापसे हे नेहमी प्रमाणे सकाळी  गावांपासुन दोन कि.मी. अंतरावर मानवत रस्त्यावरील गव्हाळी शिवारातील शेतात  आपल्या दुचाकीवरुन (एम.एच.२२ए.सी.५०९१) गेले होते. घरी परत येताना मानवत रस्त्यावर त्यांना   एम .एच.20 पि .एच.9568 या अवैध वाळूचा ट्रॅक्टरने  जोराची धडक दिली.  तत्पूर्वी   शेतातून वाळूने भरलेला ट्रॅक्टर नेण्यावरून उभयतात वाद झाला होता. ट्रॅक्टरने माझी शेती खराब होत आहे असे मयत  बाबासाहेब जिजाभाऊ धापसे म्हणाले असता    ट्रॅक्टरच्या चालकाने जोरदार धडक देऊन  गंभीर जखमी केले.या घटनेत  ठार  अशी फिर्याद सेलू पोलीस  ठाण्यात फिर्यादी मयताचा मुलगा  मुंजाभाऊ धापसे यांनी दिली आहे. या फिर्यादीनुसार गु.र.न.९१|२०१८

कलम ३०२, ५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या घटनेतील आरोपी बबन तात्याराव धुळगुंडे यास पोलीसांनी अटक केली  असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे, वालुर पोलीस चौकीचे बीट जमादार चौरे ,पो.हे. का. हे .  रंजीत आगळे हे तपास  करीत आहेत.
शनिवारी  आरोपीस अटक करून हाजर केले असता त्यास २४एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें