ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते आ. छगनराव भुजबळ यांच्यावर जाणीवपूर्वक अन्यायाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष व समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 22 अप्रैल 2018

ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते आ. छगनराव भुजबळ यांच्यावर जाणीवपूर्वक अन्यायाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष व समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते आ. छगनराव भुजबळ यांच्यावर जाणीवपूर्वक अन्यायाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष व समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष  मनोज घोडके यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

प्रतिनिधी.औरंगाबाद.
दि.२१.०४.२०१८ शनिवार रोजी विधानसभा विरोधी पक्ष नेते ना.राधाकृष्ण विखे पाटील औरंगाबाद येथे खाजगी कार्यक्रमानिमित्त औरंगाबाद येथे आले असतांना ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते आ. छगनराव भुजबळ यांच्यावर जाणीवपूर्वक अन्यायाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष व समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष  मनोज घोडके यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील तमाम ओबीसी समाजाचे आशास्थान असलेले मा. छगनराव भुजबळ साहेब यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी जाणीवपूर्वक डांबून ठेवले आहे.दोष अद्याप सिध्द नाही,बंदी करून जामीन न देणारा कायदा घटणाबाह्य आहे असा सर्वोच्च न्यायालयात नुकताच न्यायनिवाडा दिलेला आहे.
भुजबळ साहेब ओबीसी समाजाचे भाग्यविधाते आहेत आणि त्यांना जाणीवपूर्वक निवळ चौकशी च्या नावाने डांबून ठेवले आहे ,मात्र आमच्या या नेत्यावर काही हितशत्रुनी वैयक्तिक आकस ,मत्सर व राजकीय हितापोटी त्यांच्या विरोधात दिशाभूल करून कपट कारस्थान रचुन विश्वासघात केला आहे.महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा,बेनामी तसेच उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमावल्याप्रकरणी भुजबळ यांच्यावर सक्त वसुली संचालयाने कारवाई केली आहे.वारंवार न्यायाधीश यांनी गैरहजर राहणे,इर्डीच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित न राहता खाजगी कारणे व पुढील तारीख मागणे हे सर्व संशयास्पद व नाट्यमय वाटत आहे.
न्याय व्यासपीठ नक्कीच न्याय निवाडा करेल आणि भुजबळ साहेब निर्दोष असल्याचे सिध्द होईल याची आम्हाला खात्री आहे,मात्र मागील २७ महिन्यांपासून आमच्या नेत्यास अन्यायकरकरित्या तुरुंगात डांबून ठेवल्याची भरपाई सरकार कशी करणार ? हा प्रश्न आम्हां सर्वसामान्य कार्यकर्ते यांना पडला आहे.तरी आपण याची जाणीवपूर्वक नोंद घेऊन ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते छगनराव भुजबळ यांना न्याय देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवावा करिता निवेदन देत आहोत.
या प्रसंगी शिष्टमंडळास संभोधित करतांना विरोधी पक्ष नेते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढविण्यासाठी भुजबळ व त्यांची समता परिषद यांचा सिंहाचा वाटा आहे आणि याचे खरे श्रेय भुजबळ साहेबांना जाते तसेच या प्रकरणी मला आपल्या माध्यमातून प्रथमच निवेदन वा पत्रप्रपंच झाले आहे ,या विषयावर मी विधानसभेत नक्कीच भुमिका मांडणार आहे व वेळोवेळी कायम संपर्कात राहण्याचा सल्ला दिला .
या प्रसंगी राष्ट्रवादी सोशल मीडिया मराठवाडा प्रदेश सचिव जावेद खान,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास ढंगारे,शहराध्यक्ष गजानन सोनवणे, शहर कार्याध्यक्ष संदीप घोडके,निशांत पवार,आनंद शिंपी,राजेश साठे आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें