स्वामी नरेंद्र महाराज यांच्या सतसंगातील अन्नदानासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या कडून एक्कावंन हजाराची मदत.
शेख कलीम
सिल्लाेड दि.१५.(प्रतिनिधि)तालुक्यातील
अंधारी येथे शनीवार(२१)राेजी हाेनार्या स्वामी नरेंद्र महाराज(नानीज)यांच्या सतसंग कार्यक्रमातील अन्नदानासाठी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी एक्कावंन हजार रुपयांची मदत दिली.ही मदत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सतसंग आयाेजन समीतीकडे सुपूर्द केली.
अंधारी येथे शनीवारी (२१)राेजी स्वामी नरेंद्र महाराज(नानीज)यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयाेजीत करण्यात आला आहे.याच दिवशी गावातुन पालखी मिरवनुक व त्यानंतर भक्तासाठी स्वामी नरेंद्र महाराज यांचे आँनलाईन प्रवचन हाेनार आहे.यानंतर भक्तासाठी अन्नदान (महाप्रसाद)वाटप हाेत असून याच अन्नदानासाठी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी एक्कावंन हजार रुपयांची मदत दिली आहे.
आमदार सत्तार यांनी दिलेली आर्थिक मदत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सतसंग आयाेजन समीतीकडे सुपूर्द केली.यावेळी जिल्हा परीषदचे उपाध्यक्ष केशवराव तायडे,नगराध्यक्ष अब्दुल समीर,अब्दुल रहीम,भानुदास तायडे,नारायण तायडे,विश्वास तायडे,धुपद तायडे,सुखदेव तायडे,बाळु तायडे,दाैलत तायडे,नारायण तायडे,हिराबाई तायडे,रेखाबाई तायडे,मिराबाई तायडे,गंगुबाई तायडे,शेवंताबाई तायडे व सुमनबाई तायडे आदींची यावेळी उपस्थीती हाेती.
चाैकट:=उपाध्याय तायडे यांच्याकडून एलसिडी भेट!
दरम्यान दर आठवड्याला अंधारीत स्वामी नरेंद्र महाराज यांचे प्रवचन आँनलाईन पध्दतीने हाेनार आहे.या प्रवचनासाठी भक्तांना आवश्यक असनारी एलसिडी टिव्ही जिल्हा परीषदचे उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी भेट स्वरुपात दिली आहे.
फाेटाे:=अंधारी येथील स्वामी नरेंद्र महाराज यांच्या कार्यक्रमसाठी एक्कावंन हजाराची मदत देतांना नगराध्यक्ष अब्दुल समीर

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें