दुधनाचे पात्र भरलयाने,पूर्णा नदीचाही वाढला प्रवाह. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 7 अप्रैल 2018

दुधनाचे पात्र भरलयाने,पूर्णा नदीचाही वाढला प्रवाह.

 दुधनाचे पात्र भरलयाने,पूर्णा नदीचाही वाढला प्रवाह.                          ़़़.                       ...........................................


प्रतिनिधी.परभणी.
परभणी जिल्ह्याचे तापमान एकीकडे ४० अंशापुढे गेले असताना परभणी व पूर्णा शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून ८ दलघमी पाणी सोडण्यात आल्याने दुधना नदीचे पात्र तुडूंब भरले आहे. हे पाणी दुधनातून पूर्णा नदीत प्रवाही झाले आहे. परभणी व पूर्णा शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही शहरांना पूर्वी येलदरी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु, गेल्या वर्षी येलदरी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला नसल्याने निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीच्या माध्यमातून या शहरांना पाणी दिले जात आहे. या अनुषंगाने १ एप्रिल रोजी निम्न दुधना प्रकल्पातून या दोन्ही शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ८ दलघमी पाणी १२०० क्युसेसने दुधना नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत दुधना नदीचे पात्र तुडूंब भरुनवाहू लागले आहे.हे पाणी दुधना नदीतून पूर्णा नदीत प्रवाही झाले असून ते परभणी- वसमत रस्त्यावरील राहटी येथील बंधाऱ्यातही दोन दिवसांपूर्वीच पोहचले. तेथून ते पूर्णा शहराजवळ असलेल्या  बंधाऱ्यातही पोहचले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत दुधना बरोबरच पूर्णा नदीपात्रातही मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने या नदीकाठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सध्या तरी सुटला आहे. शिवाय वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय झाली आहे. नदीपात्रामध्ये केवळ पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असल्याने या पाण्याचा व्यावसायिक वापर केला जावू नये,याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें