तालुक्यात गावोगावी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्याची शेतकऱ्यांची मागणी.
कुठल्याच कंपनीकडून बोगस खत तसेच बोगस बियाण्याची विक्री न होण्याची मागणी.
प्रतिनिधी- शे.सलिम.
भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील तरुण शेतकऱ्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची कुठल्याच कंपनीकडून फसवणूक होऊ नये म्हणून कृषिविभाग कार्यालय भोकरदन तसेच कृषिविभाग पंचायत समिती कार्यालयात कृषी अधिकारी डी. एस.काकडे यांच्याकडे निवेदन दिले.निवेदनात नमूद केलेले आहे की, तालुक्यात मागील वर्षी न्यूजीविडु सिड्सचे 207 हे कपाशीचे बियाणे बोगस दिल्याने कंपनीने फसवणुक केल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती तसेच व्याजाने पैसे काढून आर्थिक झळ सोसावी लागली होती.याचा पंचनामा जिल्हा कृषिअधिक्षकांनी तसेच कृषिविभागाने मौजे बरंजळा लोखंडे येथे शेतात येऊन पंचनामा केला होता.या पंचनाम्याचा जूनमध्ये अहवाल कृषिविद्यापीठ परभणी येथे तपासणी साठी पाठविण्यात आला होता मात्र अद्यापही बोगस बियाणे दिलेल्या कंपनीवर कुठलाच गुन्हा नोंद झालेला नाही.त्यामुळे तरुणांनी कृषीवभावर नाराजी व्यक्त केली.तसेच शेतकऱ्यांना गुलाबी बोडंअळी पासून होणारा धोका,बोगस खत,बोगस औषधी,बोगस बियाणे तसेच चढ्याविक्रीने होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी कृषिविभागाने गावोगावी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना होणाऱ्या फसवनूकीतून सावध करण्यासाठी कृषिविभागाने त्वरित कार्यक्रम घेण्याची आवश्यकता असून शेतकऱ्यासाठी कोणते कपाशीचे वाण लावायला पाहिजे हे सुद्धा सांगायची गरज आहे.बॉंडअळीचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याची गरज आहे.येत्या महिन्यात शेतकरी ठिबक सिंचनवर कपाशीची लागवड करणार असल्याने त्यांची कुठेही फसवणूक होऊ नये यासाठी कृषिविभागाने गावोगावी मार्गदर्शनपर कार्यक्रम राबविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
नसता जर कृषिविभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले नाही तसेच तालुक्यात बोगस खत,बोगस बियाणे भविष्यात आढळून आले आणि शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागल्यास व कृषिविक्रेते व कंपनीकडून जर फसवणूक झाली तर याला सर्वस्वी जबाबदार कृषिविभाग राहील आणि तसे झाल्यास शेतकऱ्यांच्या वतीने कृषिविभागातील अधिकाऱ्यांच्या खुर्च्यासंहित इतर साहित्य गायब करून निषेध करण्याचा इशारा तरुण शेतकऱ्यांनी दिला.या निवेदनावर शेतकरी अनिल भुतेकर,नारायण लोखंडे,अर्जुन खांडवे,संदीप भोकरे,समाधान लोखंडे,दिपक जाधव,बळीराम लोखंडे,श्रावण वाघ,बंडू जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रतिक्रिया- शेतकऱ्यांनी कुठल्याही भुलताफाना बळी पडू नये. ज्या कृषिविक्रेत्यांकडे नियमधारक लायसन्स आहे अश्याच विक्रेत्याकडून बियाणे ,खत पावती घेऊन खरेदी करावे.शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरीय मार्गदर्शन कार्यक्रम येत्या आठवड्यात घेण्यात येणार असून गावोगावी सुद्धा कृषिसहाय्यक तसेच ग्रामसेवक कृषिविभागामार्फत मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात येईल .बोगस बियाणे पकडणे भोकरदन तालुक्यातूनच सुरुवात झाली व यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावे.श्रीमती आर.जी.बोडखे -तालुका कृषी अधिकारी
प्रतिक्रिया-कृषी विभागाने या वर्षी गुलाबी अळीने झालेले नुकसान लक्षात घेता पुढील लागवडीसाठी शेत कऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे आहे,तसेच बोगस बियाणे व खते हे बाजारपेठेत येऊच नयेत यासाठी कृषी विभाग व प्रशासनाने संवेदनशीलपणे विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची वेळच येणार नाही . व शेतकऱ्यांचे नुकसानही टळेल.अनिल भुतेकर -शेतकरी बरंजळा लोखंडे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें