भोकरदन बसस्थानकात मोफ्त पाणी सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल,अवैध्य रित्या पाणी विकनारे झाले मालामाल.
शे.सलिम.प्रतिनिधी : भोकरदन
जालना जिल्यातील भोकरदन तालुका हे एक प्रसिद्ध तालुका आस्ताना येथे नागरिकांसाठी कोणतीच सोया-सुविधा उपलब्ध नाही तसेच तालुक्यातील प्रवाशांसाठी मुख्य बस्थानक येथे प्रवाशांना कडक ऊन आणि लांबचा प्रवास बसची वेळ होईपर्यंत क्षणभर विश्रांती पण बस येताच कुठे जाते हे पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ यामुळे घशाला कोरड पडते. पण बसस्थानकात कोठेच पाणी नाही. त्यामुळे बाहेर हॉटेलात जाऊन पाणी प्यायचे व पुन्हा बसची वाट पाहायची. ही अवस्था आहे तालुक्याचे ठिकाण असलेल्या भोकरदन बसस्थानकाची झाली आहे.
एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका वाढत असताना बसस्थानकात पिण्याच्या पाण्याच सोय नाही. तहान लागल्यानंतर स्थानकाबाहेर जाऊन हॉटेलमध्ये पाणी प्यावे लागते. या धावपळीत बस हुकण्याची शक्यता असते.या बसस्थानकात महिणाभरापासुन पिण्याची पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. बसस्थानकात पाणी नसल्याने हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या प्रवाशांवर हॉटेलचालक खेकसतात. अनेक वेळा पाणी पिण्यास मनाई केली जाते. परिणामी १० ते १५ रुपयांची थंड पाण्याच बाटली २० ते २५ रुपयांना खरेदी करावी लागते. बसस्थानकातील उपहारगृह बंद असल्याने पाणी खरेदीसाठी बाहेर रस्त्यावर जावे लागते. महामंडळाचे कर्मचारी, वाहक, चालक यांना सुद्धा या बसस्थानकात पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यांना रस्त्यावरील हॉटेलांत जाऊन तहान भागवावी लागते. तरी महामंडळाने लवकरात लवकर स्वच्छ पाण्याची वयवस्था करावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
: भोकरदन बसस्थानकात पिण्यायोग्य पाणी नसल्याने पाणी पिण्यासाठी बसस्थानकाच्या बाहेर जाऊन हाॅटेलवर पाणी प्यावे लागत असुन,बसस्थानकात प्रवाशांसाठी फिल्टर बसवावे.
दिपक जाधव : प्रवासी
:फिल्टर मशिनसाठी माजी नगराध्यक्ष हे बस्थानकात नविन फिल्टर बसवून देणार असल्याचे सांगितले आहे.लवकरच प्रवाशांना फिल्टरचे पानी मिळेल.
एन.डी. राऊत: कंट्रोलर भोकरदन बस्थानक.:दोन महिन्यापूर्वी गणपती बँक परिवाराकडून पाणी फिल्टर आणले असून,बस्थानकात महामंडळाची सहमती मिळाल्यास लवकरच पाणी फिल्टर मशिन बसवण्यात येईल व प्रवाशांना थंड पाणी मिळेल. राजाभाऊ देशमुख : माजी नगराध्यक्ष तथा गणपती बँक अध्यक्ष भोकरदन

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें