मानोली येथील प्रकरणी चौकशी समीती गठित. तहसिलदार नकुल वाघुंडे यांची पञकार परिषदेत माहिती. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 21 अप्रैल 2018

मानोली येथील प्रकरणी चौकशी समीती गठित. तहसिलदार नकुल वाघुंडे यांची पञकार परिषदेत माहिती.

मानोली येथील प्रकरणी चौकशी समीती गठित.

तहसिलदार नकुल वाघुंडे यांची पञकार परिषदेत माहिती.

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२१: मानवत तालुक्यातील मानोली येथील नुक्तेच ग्रामस्थानी तहसिल कार्यालयात केलेल्या सामुहिक आत्महत्या प्रकरणी प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असुन मानोली येथे झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी समीती नेमण्यात आल्याची माहिती तहसिलदार नकुल वाघुंडे यांनी आज दि.२१ एप्रिल रोजी  दिली ते यावेळी आयोजीत पञकार परिषदेत सकाळी ११ वाजता  बोलत होते.
दि.१० एप्रिल रोजी मानोली येथील ग्रामस्थानी गावातील विविध कामात भ्रष्टाचार बाबत चौकशी करण्याची मागणीचे निवेदन दिले होते व चौकशी लवकरात लवकर न झाल्यास दि.१९ एप्रिल रोजी आत्मदहनाचा ईशारा देण्यात आला होता.यातील ६ निवेदनकर्ता यांनी दि.१९ एप्रिल रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता याची गंभीर दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली असुन दि.२० एप्रिल रोजी या प्रकरणी चौकशी समीती गठित केली आसुन उपविभागीय अधिकारि पाथरी यांची चौकशी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसेच सदस्यपदी उपमुख्यकार्यकारी अधिकारि पंचायत जि.प.परभणी ,कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जि.प.परभणी ,जिल्हा आरोग्य अधिकारि परभणी ,कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग परभणी यांचि समिती  नेमण्यात आली असुन उपरोक्त चौकशी समितीने ८ दिवसाच्या आत चौकशी करुन अहवाल सादर करावा असे आदेश देण्यात आले आहे सदर अहवाल तयार करुन सादर करण्यांची जबाबदारी उपमुख्यकार्यकारी अधिकारि पंचायत जि.प.परभणी यांची राहील असे प्रसिद्धीपञकात नमुद केले आहे.यावेळी मानवत तालुक्यातील पञकार या पञकार परिषदेमध्ये  उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें