परभणी येथील विस्तारित समाधान शिबीर यशस्वी झाल्याबद्दल=ना.लोणीकर यांच्याकडून पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे अभिनंदन.
जालना, दि. 21 - लोणीकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघात विस्तारित समाधान कार्यक्रमकरीता शिबिराची फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात घोषणा केली आणि त्यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघात एक वेगळंच वातावरण तयार झालं. परभणी व जालना जिल्हयातील अधिकाऱ्यांनी हे काम जिल्ह्याचे ना. लोणीकर यांच्या अविरत विविध बैठकांनंतर एक आव्हान म्हणून घेतले. ना. लोणीकर यांच्या प्रेरणेने प्रशासनात अशा प्रकारे आयोजित होणारे समाधान शिबीर पहिलेच सल्यामुळे काटेकोर नियोजन करण्याबरोबरच उत्साह निर्माण होऊन नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीची व समाधान शिबीर नाविन्यपूर्ण व्हावा यासाठीची धडपड आणि धावपळ सुरु झाली. ना. लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विविध आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांमुळे समाधान शिबीराची सगळी जबाबदारी नीटपणे पार पाडण्यासाठी असणारा आत्मविश्वास अधिकारी, कर्मचारी व जनतेत निर्माण झाला.दि. १९ एप्रिल ला परभणी येथे राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या विस्तारित समाधान योजनेचा समारोप झाला . या प्रसंगी समाधान शिबिरात लाभ मिळालेल्या हजारो लाभार्थ्यांनी उत्स्फूर्ततेने हजेरी लावली होती. गेल्या २ महिन्यापासून परभणी लोकसभा मतदारसंघात "विस्तारित समाधान शिबीरांच्या " माध्यमातून राज्य व केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शासकीय यंत्रणा मार्फत पोहचविण्यात आला ,या यशाच्या मागे परभणी व जालना जिल्ह्यातील सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान आहे, त्यामुळे जालना जिल्ह्याचा पालकमंत्री व परभणी जिल्ह्याचा संपर्कमंत्री म्हणून दोन्ही जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व लाभार्थ्यांचे ना. लोणीकर यांनी अभिनंदन केले आहे. राज्य शासनाचा एक मंत्री म्हणून या समाधान शिबीर च्या माध्यमाने जालना व परभणी जिल्ह्यातील १३ तालुक्यातील गरीब ,वंचित व दीनदुबळ्या लोकांची सेवा करायची संधी मिळाल्या बद्दल ना. लोणीकर यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
समाधान शिबीर हा प्रशासनासाठी सुद्धा एक अतिशय वेगळा आणि सुरेख अनुभव ठरला. ना. लोणीकर यांच्या विशेष मार्गदर्शनाने व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची मदत व सल्ल्यांमुळेच आम्हांला इतके मोठे काम करणे सोपे झाले असे मनोगत या शिबिरांचे आयोजन करणाऱ्या महसूल प्रशासन अधिकारी यांनी व्यक्त केले. पालकमंत्री श्री लोणीकर यांनी समाधान शिबिराच्या तालुकास्तरीय विविध बैठकीत सुरु असलेल्या कामांचे कौतुक केले. त्यामुळेच या समाधान शिबिरातपरभणी जिल्ह्यातील २ लाख व जालना जिल्ह्यातील घनसावनगी व परतूर मतदारसंघातील १ लाख अशा एकूण ३ लाख लोकांना लाभ देण्याचे शिवधनुष्य आम्हाला पेलता आले अशीही भावना काही संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी व्यक्त केली. समाधान शिबिरात उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल सर्व नागरिकांचे प्रशासनाने सुद्धा आभार व्यक्त केले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें